Team India for World Cup 2023: यंदाच्या वर्षी होणारा वर्ल्डकप अत्यंत खास असणार आहे. याच कारण म्हणजे तो भारतात आयोजित केला जाणार आहे. नुकतंच वर्ल्डकपसाठी टीम इंडिया घोषणा करण्यात आली. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनफीट असेलल्या केएल राहुलला तर ऑऊट ऑफ फॉर्म असलेल्या सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आल्याने सिलेक्टर्स आणि मॅनेजमेंटवर टीका करण्यात आली आहे. मात्र या गोष्टींमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे, गेल्या 3 वनडे वर्ल्डकपसाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या तुलनेत यंदाची टीम ही सर्वात वयस्क आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 3 वर्ल्डकपसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय टीमचं विश्लेषण केलं, तर यावेळी सर्वात वयस्क टीम निवडला गेली असल्याचं तुमच्या लक्षात येईल. यावेळी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय टीममध्ये 7 खेळाडू आहेत ज्यांनी वयाची 30 ओलांडली आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा या टीममधील सर्वात वयस्कर असून त्याचं वय 36 वर्षे आहे.


सर्वात वयस्क असणारे खेळाडू


रोहित शर्मा (36), विराट कोहली (34), रवींद्र जडेजा (34), मोहम्मद शमी (33), सूर्यकुमार यादव (32), केएल राहुल (31) आणि शार्दुल ठाकुर (31).


गेल्या 3 वर्ल्डकपच्या तुलनेत सर्वात वयस्क संघ


  • 2011 मध्ये निवडलेल्या टीम इंडियाचे सरासरी वय 28.65 वर्षे होतं.

  • 2015 मध्ये निवडलेल्या टीमचं सरासरी वय केवळ 27.36 वर्षे होतं.

  • 2019 मध्ये निवडलेल्या टीमचं सरासरी वय 29.92 वर्षे होते.

  • तर यंदाच्या निवडलेल्या टीम इंडियाचं सरासरी वय 30.07 आहे.


शुभमन गिल सर्वात तरुण खेळाडू 


यंदाच्या वर्ल्डकपसाठी सर्वात तरूण खेळाडू म्हणून शुभमन गिलचं नाव समोर येतंय. सध्याच्या वर्ल्डकपसाठीच्या टीममध्ये तो सर्वात तरुण खेळाडू आहे. शुभमन गिल सध्या फक्त 23 वर्षांचा आहे. 


वर्ल्डकप टीममधील युवा खेळाडू (30 वर्षांखालील)


शुभमन गिल (23), ईशान किशन (25), श्रेयस अय्यर (28), कुलदीप यादव (28), जसप्रीत बुमराह (29), हार्दिक पंड्या (29), मोहम्मद सिराज (29) आणि अक्षर पटेल (29).


ऑक्टोबरपासून होणार वर्ल्डकपला सुरुवात


आशिया कपनंतर अवघ्या काहीच दिवसांनी आयसीसी वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत पहिलाच सामना इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी असून भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध मैदानात उतरणार आहे.


वर्ल्डकपसाठी कशी आहे टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.