राहुल गांधींकडून विराट कोहलीचं समर्थन, टीम इंडियाच्या कर्णधाराला दिला हा सल्ला
सलग 2 पराभवानंतर टीम इंडियावर होतेय टीका
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंच्या पराभवाचा आणि विजयाचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही होतो. टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat kohli)सह सर्व खेळाडूही ट्रोलच्या निशाण्यावर आले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आता विराटच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
राहुल गांधी यांचे समर्थनार्थ ट्विट
राहुल गांधींनी ट्विट करत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहलीचे समर्थन केले आहे. राहुलने लिहिले, 'प्रिय विराट, हे सर्व लोक द्वेषाने भरलेले आहेत, ज्यांना कोणी प्रेम देत नाही. तुम्ही त्यांना क्षमा करा आणि तुमच्या संघाचे रक्षण करा. याआधीही पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर गोलंदाज मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) निशाणा साधला होता, तेव्हा राहुलने ट्विट करून त्याचे समर्थन केले होते.
कोहलीपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही कोहलीचे समर्थन केले होते. इंजी यांनी कोहलीच्या मुलीला धमकावणार्यांना फटकारले आणि हे लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. कोहलीच्या फलंदाजीवर किंवा त्याच्या कर्णधारपदावर टीका करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पण क्रिकेटपटूच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे इंझमाम म्हणाला.
भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकातील एकही सामना जिंकलेला नाही. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 8 गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाला आता स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला असून, संघ आपला पुढील सामना बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे.