Corona : मदतीचं आवाहन करणाऱ्या युवी-भज्जीवर टीकेचा भडीमार, कारण...
कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरनाचा सामना करण्यासाठी अनेक भारतीय क्रिकेटपटू पुढे आले आहेत. रोहित शर्मा, गौतम गंभीर, अनिल कुंबळे, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी गरजूंना मदत केली आहे. पण युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी केलेल्या मदतीच्या आवाहानमुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.
युवराज सिंगने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला पाठिंबा दिला आहे. तर हरभजन सिंगनेही शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. 'जगातली लोकं कठीण काळातून जात आहेत. आपल्याकडून प्रयत्न केले गेले पाहिजेत. शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन चांगलं काम करत आहे. तुम्ही त्याला साथ द्या आणि जेवढी मदत करणं शक्य असेल, तेवढी मदत करा,' असं हरभजन म्हणाला आहे.
युवराज आणि हरभजन सिंगने केलेल्या या आवाहनानंतर ट्विटरवर या दोन्ही क्रिकेटपटूंवर जोरदार टीका होत आहे.