मुंबई : जर तुम्ही क्रिकेटचे खरे चाहते असाल तर तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल की टी-20 दंगलमधील तिकिटं मिळवणं किती कठिण आहे ते. लढत सुरु होण्यापूर्वी कित्येक तास आधी स्टेडियमजवळ जाऊन गैरमार्गानं किंवा ब्लॅक तिकिटं खरेदी करणं हा पद्धत आता जुनी झाली आहे. कारण आता तिकिटांचा काळाबाजार सोशल मीडियामार्फत केला जातोय.  याच काळाबाजाराच पर्दाफाश झी मीडियानं केला आहे.


कसा होतोय तिकिटांचा काळाबाजार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे तिकिटांचा काळा बाजारही आता हायटेक पद्धतीनं केला जातोय. आता तिकिटांचा काळा बाजार हा केवळ स्टेडियमच्या जवळपास केला जात नाही. तर तिकिटांची विक्री ही सोशल मीडियामार्फत केली जाऊ लागली आहे. यामुळे खरे क्रिकेट चाहते मात्र क्रिकेटपासून दूर राहत आहेत. जेव्हा तुम्ही अधिकृत वेबसाईटवर तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा सगळी तिकिटी विकली गेली आहेत हे तुमच्या लगेच लक्षात येईल. याचाच फायदा उठवत मग तिकिटांचा काळाबाजार करण्यासाठी संबंधितांनी हायटेक मार्गाचा अवलंब केलाय. इंटरनेटवर 'Buy IPL Ticket' सर्च केल्यावर अनेक लोकांची प्रोफाईल्स, कम्युनिटी आणि ग्रुप्स समोर येतील. ज्याद्वारे खुलेआम तिकिट अनधिकृतरित्या विकली जात आहेत. काळा तिकिटांच्या या बाजारात शिकलेले लोक तिकिटांची दलाली करताना दिसतात. या काळा बाजारात काही दलालांचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी या दलालांना संपर्क साधला असता त्यांना 800 रुपयाचं तिकिट तब्बल 2800 रुपयांना मिळेलं असं सांगण्यात आलं.


खेळाच्या नावावर क्रिकेट चाहत्यांच्या भावनांशी गद्दारी


विशेष म्हणजे अधिकृत वेबसाईटवर सारी त्वरित तिकीट विकली जात आहेत. यामुळे हे लोक आतील लोकांशी हातमिळवणी करुन कित्येक तिकिट विकत घेतात आणि आगामी लढतींची अनेक तिकिटही एकदम विकतात. याखेरीज कॉम्पिमेंटरी तिकिटांचाही काळाबाजार केला जात आहे. खेळाच्या नावावर क्रिकेट चाहत्यांशी हो मोठा धोकाच आहे.