मुंबई: क्रिकेटच्या मैदानात अनेक मजेशीर गोष्टी घडत असतात. सामन्या दरम्यान कधी कॅच पकडताना तर कधी बॉलला अडवताना गमतीजमती घडतात. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच एका फील्डरचा व्हिडीओ समोर आला होता ज्याने फील्डिंग करताना बॉल चौकार जाण्यापासून रोखला खरा पण बॉलरकडे देण्याऐवजी उत्साहाच्या नादात बाउंड्रीबाहेर फेकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या काउंटी चॅम्पिनशिप 2021चे सामने सुरू आहेत. या सामन्या दरम्यान फील्डिंग करत असताना एक मजेशीर प्रकार घडला. ग्लॅमोर्गन टीमचे विकेटकीपर-फलंदाज ख्रिस कुकचा व्हिडीओ समोर आला आहे. फील्डिंग करताना त्याला पाय घसरला आणि जवळपास तो स्टंपवर पडलाच. त्याच्या पायाने स्टंप खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 




कॅन्टरबरी इथे केन्ट आणि ग्लेमोर्गन यांच्यात सामना सुरू होता. 28व्या ओव्हरदरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मायकल नेसर याने इंग्लंडच्या टीमचा फलंदाज सॅम बिलिन्ग्ससाठी बॉल फेकला. सॅमने हा बॉल टोलवला. फील्डिंग दरम्यान रन आऊट करण्यासाठी खेळाडूंची धावाधाव सुरू झाली. डिपमध्ये खेळाडूनं बॉल फेकला आणि तो ख्रिस कुक पकडण्याचा प्रयत्न करताना त्याचा पाय घसरला आणि हा सगळा प्रकार घडला.


Shikhar Dhawan ने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन फॅन्सला दिलं सरप्राईज


सोशल मीडियावर काउंटी चॅम्पियनशिपदरम्यानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. 23 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.