मुंबई: इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेवर टीम इंडियाने विजय मिळत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपलं स्थान पक्क केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत विरुद्ध न्यूझिलंड असा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहेच पण त्याच सोबत एक वाईट बातमीही आहे. या वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्यावर कोरोनाचं सावटही असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमध्ये 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये भारतीय संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. पण आयसीसीने घेतलेल्या निर्णयाचा या अंतिम सामन्यावर परिणाम होईल. गेल्या वर्षी जूनमध्ये आयसीसीने कोरोन च्या दृष्टीने काही निर्बंध घातले होते. हे निर्बंध आता जुलै 2021पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 


कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीनं ICCने मागच्यावर्षी तिथल्याचं न्यूट्रल अंपायरसाठी इंग्लंडमधील पंचांना परवानगी मिळाली. याचं कारण एका पंचानं दुसऱ्या देशात जाणं-येणं करू नये हा त्यामागचा हेतू होता. आताही हाच निर्णय कायम ठेवण्यात आल्याची माहिती क्रिकइन्फोनं दिली आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोलंदाजांना चेंडूला थुंकी लावता येणार नाही. थुंकी लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा नियमही अंतिम सामन्यासाठी असणार आहे. याशिवाय सॉफ्ट सिग्नलवरही चर्चा सुरू आहे. त्याबाबत देखील लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. 


सामन्यात स्थानिक अंपायर असणार आहेत. यासंदर्भात 1 एप्रिलपर्यंत अंतिम निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. आता या नियमामुळे 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर परिणाम त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. इंग्लंड देशातीलच अंपयार साऊथॅम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात असेल. इंग्लंडचे पंच ख्रिस ब्रॉड, रिचर्ड केटलबरो, मायकेल गफ आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांना जबाबदारी देण्यात आली आहे.