Eoin Morgan Retirement Announced: क्रिकेट जगतात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कप जिंकन देणाऱ्या खेळाडूंनी आतंराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. इंग्लंडला 2019 मध्ये वर्ल्ड कप (World Cup 2019) जिंकून देणाऱ्या इयान मॉर्गेनने (Eoin Morgan) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. इयान मॉर्गेनने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. इयान मॉर्गेनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, त्यानंतर आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
इयान मॉर्गेनने इंग्लंडसाठी (England Cricket Team) 225 एकदिवसीय सामन्यात 13 शतकांसह 6957 धावा केल्या आहेत. इयान मॉर्गेनने 126 सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. यात त्याने 76 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. इयान मॉर्गेनच्या नेतृत्वातच इंग्लंडने पहिला वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली होती.


आयर्लंड संघाकडूनीह खेळला
इयान मॉर्नेने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आयर्लेंड संघाकडून केली होती. त्यानंतर मॉर्गेनने इंग्लंड क्रिकेट संघात पदार्पण केलं. इयान मॉर्गनच्या नावावर केवळ 16 कसोटी सामन्यांची नोंद आहे.