Graham Thorpe News: इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्पच्या (Graham Thorpe) मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. पाच ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचं निधन झालं होतं. थॉर्प गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त होता. थॉर्पच्या निधनाने इंग्लंड क्रिकेटमध्ये (England Cricket) खळबळ उडाली आहे. ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूच्या सात दिवसानंतर त्याची पत्नी अमांडा थॉर्पने (Amanda Thorpe) मृत्यूचं कारण सांगितलं आहे. अमांडाने दिलेल्या माहितीनुसार थॉर्पने दीर्घकाळ नैराश्य आणि चिंतेशी झुंज दिल्यानंतर स्वत:चा जीव घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडसाठी 100 कसोटी
ग्रॅहम थॉर्पच्या निधनाची पहिली बातमी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दिली होती. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल आर्थटनला दिलेल्या एका मुलाखतीत अमांडाने थॉर्पच्या मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ग्रॅहम थॉर्प गेल्या अनेक काळापासून मानसिक आणि शारीरिक आजाराशी झुंज देत होता. या दिर्घ आजाराला कंटाळून त्याने टोकाचा निर्णय घेतला. ग्रॅहम थॉर्प इंग्लंडसाठी तब्बल 100 कसोटी आणि 82 एकदिवसीय सामने खेळला होता. यात त्याच्या नावावर 9 हजार धावा जमा आहेत. 


याआधीही आत्महत्येचा प्रयत्न
ग्रॅहम थॉर्पने 2022 मध्येी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अमांडा थॉर्पने दिलेल्या माहितीनुसार पत्नी आणि दोन मुली असतानाही ग्रॅहमचं एका महिलेशी संबंध होते, दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत होते, आम्हाला याबाबत काहीच आक्षेप नव्हता, त्यांची प्रकृती सुधारावी हिच आमची अपेक्षा होती, पण दुर्देवाने ते यातून बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. याआधी 2022 मध्ये त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यातून ते वाचले. पण यामुळे बराच काळ ते आयसीयूमध्ये होते अशी माहिती अमांडाने दिली. 


ग्रॅहम थॉर्प यांना दोन मुली आहेत, किट्टी (22) आणि एम्मा (19) अशी त्यांची नावं आहे. थॉर्पसाटी इंग्लंडच्या फार्नहॅम क्रिकेट क्लबने शोकसभेचं आयोजन केलं होतं. यात पत्नी अमांडा आणि दोन्ही मुली किट्टी आणि एम्मा सहभागी झाल्या होत्या. ग्रॅहम थॉर्प यांचं कुटुंब त्यांच्या नावाने एक फाऊंडेशन स्थापन करण्यावरही विचार करत आहे. 


थॉर्पची क्रिकेट कारकिर्द
ग्रॅहम थॉर्पने इंग्लंडसाठी 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो 2005 म्हणजे जवळपास 23 वर्ष इंग्लंडसाठी क्रिकेट खेळलसा. या दरम्यान तो100 कसोटी आणि 82 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नाववर 6744 धावा आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 200 आहे. कसोटी क्रिकेटमध्ये थॉर्पने 16 शतकं आणि 39 अर्धशतकं केली होती.