`तो कोळसाच...` धोनीनंतर योगराज सिंहच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा... सांगितलं त्याचं भविष्य
Yograj Targets Arjun Tendulkar : भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. आता त्यांच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा आलाय.
Yograj Targets Arjun Tendulkar : भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडिल योगराज सिंग (Yograj Singh) आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. त्यानंतर युवराज सिंहला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एका दशकाहून अधिक काळ टीम इंडियासाठी खेळले आहेत. एक काळ असा होता की धोनी कर्णधार तर युवराज सिंग उपकर्णधार होता. 2007 मध्ये धोनीला टीम इंडियाचा कर्णधार बनवल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. 2007 मध्ये राहुल द्रविडनंतर एमएस धोनीकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. वास्तविक त्यावेळी युवराज सिंग उपकर्णधार होता.
धोनीला कधीच माफ करणार नाही - योगराज
योगराज सिंह यांनी ZeeSwitch च्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत एमएस धोनीवर चांगलीच टीका केली होती. 'मी महेंद्रसिंग धोनीला कधीच माफ करणार नाही, त्याने आपलं तोंड आरशात पाहायला हवं आहे. तो मोठा क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध जे केलं ते आता सर्व समोर येत आहे, यासाठी त्याला कधीच माफ केलं जाऊ शकत नाही' असं योगराज यांनी म्हटलं आहे. योगराज सिंह यांनी अनेक क्रिकेटपटूंना ट्रेनिंग दिली आहे, ते क्रिकेट अकॅडमी चालवतात.
अर्जुन तेडुलकरचं भविष्य काय?
योगराज सिंह यांनी युवराज सिंगलाही ट्रेनिंग दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही त्यांच्याकडे ट्रेनिंगला आला होता. आता योगराज यांनी अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) विषयी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता.'अर्जुन तेंडुलकर तुमच्याकडे ट्रेनिंगला आला होता, तुम्ही त्याच्या भविष्याकडे कसं पाहाता?
या प्रश्नावर उत्तर देताना योगराज सिंग म्हणाले तुम्ही कधी कोळश्याच्या खाणीत हिरा पाहिला आहे का? तो कोळसाच आहे... एखाद्या शिल्पकाराच्या हातात दिला तर तो चमकणारा कोहिनूर बनतो. तो अनमोल आहे, पण तोच हिरा जर त्याची किंमत कळत नसलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचला तर तो त्याचा नाश करतो' सध्या तो कोळश्यासारखा आहे. पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्याचं भविष्य उज्ज्वल आहे असं योगराज सिंह यांनी म्हटलं आहे.
युवराजला भारतरत्न देण्याची मागणी
योगराज सिंग यांनी युवराज सिंगला भारतरत्न देण्यात यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी सामना करत युवराज सिंगने भारतीय क्रिकेट संघासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. 2011 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराज सिंगची भूमिका महत्त्वाची होती. युलराज सिंगची लवढयी वृत्ती आणि त्याग पाहाता त्याचा देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान देऊन सन्मान व्हायला हवा असं योगराज सिंग यांनी म्हटलं आहे.