मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर या फास्टर बॉलर आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मात्र, त्याने  बॉलिंग करताना तुम्ही पाहिले आहे का? नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. यावेळी त्याने धडाकेबाज खेळी करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला बॉलिंग केली. मात्र, ही नेट प्रॅक्टीस होती. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनने शिखर धवनलाही बॉलिंग केली आहे. दरम्यान, याआधी अर्जुनची १९ वर्षांखालील मुंबईच्या संघात निवड झाली. यापूर्वी त्याने १४ व १६ वर्षांखालील गटातही चांगली कामगिरी केली आहे. सचिनने फलंदाजीमध्ये आपले नाव कमावले आहे. मात्र, अर्जुन बॉलर म्हणून अधिक प्रभावी ठरताना दिसतोय. 


अर्जुन तेंडुलकरने गतवर्षी लंडनमध्ये बॉलिंगचे धडे घेतले. इंग्लंडमध्ये जलदगती गोलंदाजीचा सराव करत असताना अर्जुनने इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोला भन्नाट यॉर्कर टाकला होता. त्याच्या या बॉलमुळे बेअरस्टोच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर अर्जुन चर्चेत आला. आता विराटलाही त्याने बॉलिंग केल्याने पुन्हा चर्चा सुरु झालेय.