Banned For 20 Years: भारत-बांगलादेश पहिली कसोटी सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) एका दिग्गज क्रिकेटपटूवर तब्बल 20 वर्षांची बंदी घातली आहे. आचारसंहितेचा उल्लंघन केल्याच आरोप या खेळाडूवर करण्यात आला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर दुलीप समरवीरावर (Dulip Samaraweera) एका प्रकरणात 20 वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुलीप समरवीरा यांना कोणत्याही पदावर रहाता येणार नाही. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दुलीप समरवीरा हे श्रीलंकेसाठी 1993 ते 1995 दरम्यान 7 कसोटी सामने आणि 5 एकदिवसीय सामने खेळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुलीप समरवीरावर एका महिला खेळाडूशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरु आहे. 2008 मध्ये दुलीप समरवीरा ऑस्ट्रेलियात क्रिकेट व्हिक्टोरिया क्लबसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर त्याना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महिला संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आंलं.


क्रिकेट जगतात खळबळ


महिला संघातील एका खेळाडूबरोबर दुलीप समरवीरा यांनी गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवत त्यांनी आचारसंहिता कलम 2.23 चं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे याची तक्रार करण्यात आल्यानंतर याचा गांभीर्याने तपास सुरु करण्यात आला. तपासात दुलीप समरवीरा दोषी आढळला होता. यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी निवेदन जारी केलं आहे. महिला खेळाडू आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रतिबद्ध आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला प्रोत्साहन दिलं जाणार नाही असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे. क्रिकेट खेळासाठी हे हानीकारक असल्याचं सांगत ही कारवाई करण्यात आल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्टीकरन दिलं आहे.


52 वर्षांचा दुलीप समरवीरा हा भारत दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलिया ए महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहाणार होता. पण त्याआधीच त्याला या पदावरुन हटवण्यात आलंय. समरवीराचा लहान भाऊ थिलन समरवीराही श्रीलंके क्रिकेट संघाचा खेळाडू होता. थीलन समरवीरा श्रीलंकेसाठी तब्बल 81 कसोटी आणि 53 एकदिवसीय सामने खेळला आहे.