अहमदनगर: क्रिकेट खेळताना चेंडू टाकून बाद केल्याचा राग आल्याने एका फलंदाज खेळाडूने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजावर चाकूने वार केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात गोलंदाज जखमी झाला असून, त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भररस्त्या घडली घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर शहरात रात्रीच्या वेळी तशी फारशी वर्दळ नसते. तुरळक वाहतूक, रात्रीची नीरव शांतता आणि अंधाराला भेदणारा रस्त्यांवरील विजेचा प्रकाश, अशा वातावरणात शहरातील तरूण क्रिकेटचा आनंद घेत असतात. अहमदनगरमधील माळीवाडा परिसरातील शिवम प्लाझा या चित्रपटागृहासमोरही रविवारी काही तरूण क्रिकेटचा आनंद घेत होते. सामना सुरू होता. दरम्यान, विशाल हुच्चे (वय २५ वर्षे ) या फलंदाजाने चेंडू टाकला. या चेंडूवर वैभव लंगोटे हा फलंदाज बाद झाला. बाद व्हावे लागल्याने वैभवला भलताच राग आला. या रागाच्या भरत त्याने चाकू बाहेर काढत विशालवर सपासप वार करण्यास सुरूवात केली. इतर खेळाडूंच्या समोर भररस्त्यात ही घटना घडत असताना विशालच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नाही.


पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद


... अखेर जखमी अवस्थेत पडलेल्या विशालला ठार मारण्याची धमकी देत वैभव तेथून निघून गेला. त्यानंतर विशालला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विशालने पोलिसांकडे तक्रार सोमवारी नोंदवली. विशालच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करू घेतला असून, आरोपी वैभवचा शोध सुरू केला आहे.