IND vs BAN Revised Schedule: भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. अशातच आता बीसीसीआयने तीन मोठे बदल केल्याचं पहायला मिळतंय. बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक (BCCI Annouced revised schedule) देखील शेअर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-ट्वेंटीचा सामना सुरुवातीला 6 ऑक्टोबर 2024 रोजी धर्मशाला येथे होणार होता. आता ड्रेसिंग रूममध्ये हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या सुधारणा आणि नूतनीकरणाच्या कामामुळे ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. 



इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्थळांची अदलाबदल करण्यात आली आहे. पहिला सामना हा 22 जानेवारी रोजी चेन्नईत होणार होता, मात्र आता कोलकातामध्ये आयोजित करण्यात आलाय. तर दुसरा सामना कोलकातामध्ये होणार होता, तो सामना आता चेन्नईमध्ये होणार आहे. कोलकाता पोलिसांनी बंगालच्या क्रिकेट असोसिएशनला त्यांच्या प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या वचनबद्धता आणि दायित्वांबाबत केलेल्या विनंतीमुळे हे स्थळ बदलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.


IND vs BAN मालिकेचं शेड्यूल 


भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत तर दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. दुसरा सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत तर तिसरा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.


बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य स्कॉड


रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान (WK), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.