Umpires Test : अंपायरिंगच्या परीक्षेत पंच क्लिन बोल्ड, प्रश्न वाचून तुम्ही व्हाल `आऊट`
बीसीसीआयने घेतलेल्या चाचणीत 140 पैकी 137 उमेदवार नापास, वाचा काय होते प्रश्न
BCCI Umpires Test: क्रिकेटच्या मैदानात अंपायरची भूमिका अंत्यत महत्त्वाची असते. अंपायरकडून निष्पक्ष भूमिकाची अपेक्षा ठेवली जाते. पण अंपायर (Umpires) बनण्यासाठी काय करावं लागतं हे खुपच कमी लोकांना माहित असतं. एक यशस्वी क्रिकेटर बनणं जितकी कठिण आहे, तितकंच एक चांगला अंपायर बनणं कठिण आहे.
भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) सध्या अंपायरिंगा स्तर उंचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. बीसीसीआयने मुकतीच अंपायरच्या नियुक्तीसाठी चाचणी घेतली. ज्याचा निकालही लागला आहे. गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये (Ahmedabad) ही चाचणी पार पडली.
अंपायरिंगच्या परीक्षेत 97 टक्के उमेदवार नापास
अंपायरसाठीची ही चाचणी महिला आणि ज्युनिअर गटाच्या सामन्यासाठी (Group D) आयोजित करण्यात आली होती. या चाचणीत असे प्रश्न विचारण्यात आले होते, ज्या प्रश्नांची उत्तरं देण्यात 140 पैकी केवळ 3 उमेदवार यशस्वी ठरले. या चाचणीत अत्यंत कठिण असे 37 प्रश्न विचारण्यात आले होते.
200 गुणांसाठी ही चाचणी (Test) घेण्यात आली होती, यात 100 गुणांची लेखी परीक्षा, 35 गुणांचा व्हायवा आणि व्हिडिओ, 30 गुणांची शारीरिक चाचणी होती. यात उत्तीर्ण होण्यासाठी किमान 90 गुणे मिळवणं आवश्यक होतं.
विचारण्यात आले होते 'हे' प्रश्न
1. पॅव्हेलियनच्या काही भागाची, झाडाची किंवा खेळाडूची सावली खेळपट्टीवर पडली आणि फलंदाजाने तुमच्याकडे याची तक्रार केली तर तुम्ही काय निर्णय घ्याल?
बरोबर उत्तर : पॅव्हेलिअन किंवा झाडाला एका जागेवरुन दुसरीकडे हलवता येऊ शकत नाही. त्यामुळे फलंदाजाने तक्रार केल्यास अंपायरला डेड बॉल घोषित करण्याचा अधिकार आहे.
2. एखाद्या गोलंदाजाच्या हाताला दुखापत झाली आहे आणि त्याने हाताला पट्टी बांधली आहे, पट्टी काढली तर रक्तस्त्राव होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही गोलंदाजाला हाताची पट्टी काढण्यास सांगाल का?
बरोबर उत्तर: गोलंदाजाला गोलंदाजी करायची असेल तर पट्टी काढून टाकणं आवश्यक आहे.
3. फलंदाजाने बॉल टोलावला आणि शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटमध्ये बॉल अडकला. पण चेंडू खाली पडण्यापूर्वीच क्षेत्ररक्षकाने तो पकडला तर फलंदाज झेलबाद होणार का?
बरोबर उत्तर: फलंदाजाला नाबाद दिले जाईल.
अंपायर्सना वेतन किती मिळतं?
अंपायर्सच्या कारकिर्दीची सुरुवात ग्रुप डीच्या (Group D) सामन्यांपासून होते. राष्ट्रीय (National) आणि आंतरराष्ट्रीय (International) क्रिकेट सामन्यात पदार्पण करण्यासाठी हे सामने अत्यंत महत्वाचे ठरतात. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार परीक्षा कठिण होती, पण गुणवत्तेशी तडजोज करता येत नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग करायची असल्याने चुकीला माफी नसते.
बीसीसीआयने पंचांची 5 ग्रेडमध्ये विभागणी केली आहे. A आणि A+ गटातील पंचांना प्रथम श्रेणी सामन्यासाठी एका सामन्यासाठी 40,000 रुपये मानधन दिलं जातं, तर B, C आणि D गटातील पंचांना प्रत्येक सामन्यासाठी 30,000 रुपये दिले जातात.