क्रिकेटमधल्या देवमाणसाला भेटण्यासाठी ग्लॅन मॅक्सवेलनं अर्धवट सोडली मुलाखत, व्हिडीओ
सचिन तेंडुलकरचे चाहते आणि त्याला मानणारे केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. विदेशातील खेळाडू त्याला भेटण्यासाठी खूप आतूर असतात हे या व्हिडीओमधून दिसून येत आहे.
मुंबई: ग्लॅन मेक्सवेलनं आयपीएलमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेत आणि चर्चेत आला. IPLमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने सामने स्थगित झाले आणि खेळाडूंना आपल्या घरची वाट धरावी लागली. दरम्यान मॅक्सवेलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
लोकप्रिय असलेला मॅक्सवेल क्रिकेटमधल्या देवमाणासाला भेटण्यासाठी चक्क मुलाखत अर्धवट सोडून आला. मैदानात सुरू असलेली मुलाखत सोडून तो या क्रिकेटमधील देवमाणासाला भेटायला आला. मैदानात हा क्षण सर्वजण पाहात होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टरच्या स्थानाचा अत्यंत आदर आहे. तो 'जेंटलमॅन गेम'चा एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. सचिनचं मैदानावरील व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या खिलाडूवृत्ती यामुळे त्यांची लोकप्रियता आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे खूप फॅन आहेत.
देश-विदेशातील क्रिकेटपटूही सचिन तेंडुलकरला भेटणं म्हणजे भाग्याचं मानतात. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देवमाणूस असं समजलं जातं. सचिनचा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही नेहमीच आदर केला जातो. अशा परिस्थितीत सचिनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला.
या व्हिडीओमध्ये ग्लेन मॅक्सवेलने त्याला भेटण्यासाठी मैदानात सुरु असलेली त्याची मुलाखत अर्धवट सोडली आणि तो सचिला भेटण्यासाठी आला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या 2015 रोजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेचा ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून नेमण्यात आल होतं. अंतिम सामना पाहण्यासाठी सचिन मेलबर्नच्या ग्राऊंडवर गेला होता. तिथे हा प्रकार 2015मध्ये घडला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.