ICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यानचा दुसरा कसोटी (India vs Bangladesh 2nd Test) सामना येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअममध्ये (Kanpur Green Park Stadium) खेळवला जाणार आहे. त्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सीलने कसोटी क्रमवारी (ICc Test Ranking) जाहीर केली आहे. चेन्नई कसोटीनंतर क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. टीम इंडियाचा विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची मोठी घसरण झाली आहे. मोठ्या कालावधीनंतर मैदानावर उतरेलल्या ऋषभ पंतने कमबॅक करत दमदार कामगिरी केली आहे. चेन्नई कसोटी पंतने शानदार शतक ठोकलं होतं, याचं बक्षीस म्हणून आयसीसीने पंतचा कसोटी क्रमवारीच्या टॉप टेनमध्ये त्याचा समावेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतची मोठी झेप


रस्ते अपघातानंतर जवळपास दीड वर्षांच्या कालावधीनंतर ऋषभ पंत कसोटी क्रिकेटसाठी मैदानात परतला. चेन्नई कसोटीत पहिल्यात डावात 39 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात पंतने 109 धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात भारताने बांगलादेशवर तब्बल 280 धावांनी विजय मिळवला. शतकी खेळीच्या जोरावर पंतने कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतलीय. पंत कसोटी क्रमवारीत थेट सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात 731 पॉईंट जमा झाले आहेत. तर टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल 751 पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे. चेन्नई कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये जयस्वालने अर्धशतक झळकावलं होतं.


शुभमन गिललाही चेन्नई कसोटी शतक झळकावल्याचा फायदा झाला आहे. गिल 701 पॉईंटसह चौदाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.


विराट-रोहितला 'दे धक्का'


एकीकडे यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंतसारखे युवा फलंदाज दमदार कामगिरी करत असताना टीम इंडियाचे स्टार खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मात्र जोराचा धक्का बसला आहे. चेन्नई कसोटीत रोहित शर्माला दोन्ही डावात मिळून दहा धावाही करता आल्या नव्हता. याचा फटका त्याला बसला आहे. रोहितची तब्बल पाच स्थानाने घसरण झाली आहे. रोहित दहाव्या स्थानावर आलाय. त्याच्या खात्यात 716 पॉईंट जमा आहेत. विराट कोहलीलाही चेन्नई कसोटीत खास कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे विराट क्रमवारीत टॉप-10 मधून बाहेर फेकला गेला आहे.


विराटच्या क्रमवारीत पाच स्थानांची घसरण झाली असून 709 पॉईंटसह तो 12 क्रमांकावर फेकला गेला आहे. गोलंदाजीतही मोठे बदल आयसीसी गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीतही मोठे बदल झाले आहेत. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्याने गॉल कसोटीत शानदार प्रदर्शन केलं. जयसूर्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत 9 विकेट घेतल्या, यामुळे त्याच्या खात्यात 743 पॉईंट जमा झाले असून तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा ऑलराऊंडर 804 पॉईंटसह आठव्या स्थानावर आहे.