U-19 World Cup 2024 Schedule: नव्या वर्षात म्हणजे 2024 मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. अंडर-19 स्पर्धेची सुरुवात यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. 19 जानेवारीला हा सलामीचा सामना खेळवला जाणार असून 11 फेब्रुवारीला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया (Team India) असलेल्या ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड, यूएसए आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे. भारताचे ग्रुपमधले तीनही सामना ब्लोमफोंटेनमध्ये होणार आहेत. भारताचा ग्रुपमधला पाहिला सामना 20 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 25 जानेवारीला  आयर्लंडविरोधात आणि 28 जानेवारीला यूएसएविरोधात तिसरा सामना खेळवला जाणार आहे. 


स्पर्धेत 16 संघांचा समावेश
अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 16 संघांचा समावेश असेल. यापीक भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि झिम्बाब्वे संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला आहे. तर इतर पाच संघाचा प्रवेश क्वालिफाय सामन्यातून झालाय. यात नामिबिया, न्यूझीलंड, नेपाळ, स्कॉटलँड आणि यूएसए संघांचा समावेश आहे. 


ICC U19 स्पर्धेतले ग्रुप
ग्रुप ए: भारत, बांग्लादेश, आयर्लंड, यूएसए
ग्रुप बी: इंग्लंड, दक्षिण आफ्रीका, वेस्टइंडीज, स्कॉटलँड
ग्रुप सी: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया
ग्रुप डी: अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूजीलँड, नेपाल


अंडर-19 ची यशस्वी टीम
टीम इंडिया ही अंडर-19 विश्वचषक  (Under 19 World Cup) इतिहासतील सर्वात यशस्वी टीम आहे. टीम इंडियाने  2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये टीम इंडियाने उपविजेतेद मिळवलं होतं. भारताचा अंडर-19 संघ सध्या अंडर-19 एशिया कप स्पर्धे खेळतोय. या संघाची धुरा उदय सहारनवर सोपवण्यात आली आहे. उदय सहारन हा राजस्थानचा खेळाडू आहे. 


अंडर-19 एशिया कपसाठीचा भारतीय संघ
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरवेल्ली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (उप-कर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी.


ट्रॅव्हलिंग स्टँडबाय खिलाड़ी: प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमान.


राखीव खेळाडू: दिग्विजय पाटिल, जयंत गोयत, पी. विग्नेश, किरण चोरमले