India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) खेळवली जात असून यातला पहिला सामना गुरुवारी म्हणजे 11 जानेवारीला खेळवला जाणार आहे. मोहाली स्टेडिअमध्ये (Mohali) होणार हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान (India vs Afghanistan) ही पहिलीच टी20 मालिका आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. पण पहिल्या सामन्याला 24 तास बाकी असतानाच अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा अनुभवी आणि मॅचविनर फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जादरानने या बातमीला दुजोरा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशिद खान दुखापतग्रस्त
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर राशिद खानने आपल्या कंबरेवर शस्त्रक्रिया केली होती. यातून राशिद खान पूर्णपणे बरा झालेला नाही. भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात राशिद खानला संधी देण्यात आली होती. पण त्याच्या खेळण्यावर साशंकता होती. आता संपूर्ण मालिकेतून राशिद बाहेर पडल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 


अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जादरानने मीडियाला माहिती देताना राशिद अद्याप पूर्णपण तंदरुस्त नसल्याची माहिती दिली आहे. राशिद खान लवकरच संघात परतले अशी आम्ही अपेक्षा करतो असंही इब्राहिम जादरानने सांगितलं. राशिद सध्या रिहेबिलेटेशन प्रक्रियेतून जात आहे, भारताविरुद्धच्या मालिकेत राशिद खानची संघाला कमी जामवेल असंही अफगाणिस्तान कर्णधाराने सांगितलं. 


राशिद खानची टी20 कामगिरी
राशिद खान हा अफगाणिस्तानचा सर्वात धोकादायक फिरकी गोलंदाज आहे. अफगाणिस्तान संघाकडून खेळताना 82 आंतरराष्ट्रीय टी0 सामन्यात राशिदने तब्बल 130 विकेट घेतल्या आहेत. 3 धावात 5 विकेट ही राशिदची टी20 क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय राशिद खानने 103 एकिदिवसीय सामन्यात 183 विकेट घेतल्यात. तर 5 कसोटी सामन्यात 34 विकेट त्याच्या नावावर आहेत. 


भारत-अफगाणिस्तान सामन्याचं वेळापत्रक
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन टी20 सामने खेळवले जाणार असून यातला पहिला सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदौरमध्ये तर 17 जानेवारीला तिसरा सामना बंगळुरुत खेळवला जाणार आहे. 


भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, अवेश खान आणि मुकेश कुमार.


अफगाणिस्तान संघ
इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब.