Rohit Sharma on India vs Pakistan Test series: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. भारत-पाक सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. दोन्ही संघांमध्ये 2008 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका भारताने 1-0 अशी जिंकली होती. यानंतर राजकीय तणावामुळे आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकही कसोटी मालिका (India vs Pakistan Test Series) खेळवण्यात आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तानदरम्यान एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट मालिका 2012-13 दरम्यान खेळवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघा भारत दौऱ्यावर होता. यानंतर या दोन्ही संघात एकदिवसीय किंवा टी20 मालिकाही रंगलेली नाही.


आयसीसी स्पर्धांमध्ये आमने सामने
भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ केवळ आयसीसी किंवा आशियाई स्पर्धांमध्ये आमने सामने येतात. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. 


भारत-पाक मालिका खेळवल्या जाव्यात का?
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याच्या  Club Prairie Fire पॉडकास्टवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) भारत-पाक क्रिकेट मालिकेविषयी प्रश्न विचारण्यात आला. भारत-पाकिस्तानदरम्यान नियमित कसोटी मालिका खेळवण्यात यावी का? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्माने 'मन की बात' सांगितली. पाकिस्तानचा क्रिकेट संघ सर्वोत्तम आहे. त्यांच्याकडे जबरदस्त बॉलिंग लाईन अप आहे. भारत-पाक मालिका चुरशीची होईल असं रोहित शर्माने म्हटलं आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान 2008 मध्ये शेवटची कसोटी मालिका खेळवण्यात आली. यात वसीम जाफरने दुहेरी शतक झळकावलं होतं, अशी आठवणही रोहितने या मुलाखतीत सांगितली.


भारत-पाकिस्तानदरम्यान नियमित कसोटी मालिका झाल्यास आपल्याला आवडेल. चाहत्यांनी कडवी टक्कर पाहायला मिळेल. दोन्ही संघातील क्रिकेट सामने जबरदस्त चुरशीचा असेल, असं रोहित शर्माने म्हटलं आहे. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात, हे बरोबर नाही. मला फक्त निव्वळ क्रिकेटमध्ये रस आहे. मी दुसरं काही बघत नाही. हे शुद्ध क्रिकेट आहे. बॅट आणि बॉलमध्ये स्पर्धा आहे. ही जबरदस्त टक्कर असेल असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.


भारत-पाकिस्तान आमने सामने
भारत आणि पाकिस्तानदरम्या आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत, यापैकी 9 सामन्यात भारताने विजय मिळवलाय. तर 12 सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात केलीय. 38 सामने ड्रॉ झाल्यात.