Ind vs WI 1st ODI : वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) एकदिवसीय मालिका (Ind vs WI ODI Series) जिंकण्यासाठी सज्ज झालीय. भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज बारबाडोसमध्ये (Barbados) खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली जाईल असं वक्तव्य केलं. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोणाला संधी मिळते याची उत्सुकताही वाढलीय. यातही सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, उमरान मलिक आणि मुकेश कुमार यांना टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) संधी मिळणार का? याकडे सर्वांच लक्ष असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितबरोबर सलामीला कोण? 
भारतीय संघात सध्या इशारन किशन, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड हे तीन फलंदाज सलामीसाठी उपलब्ध आहे. अशात रोहित शर्माबरोबर सलामीला मैदानात कोण उतरणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण यात शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित आणि शुभमन गिल जोडी मैदानात उतरेल.


ईशान किंशन कि संजू सॅमनस
भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ज कप स्पर्धेपूर्वी नियमित विकेटकिपर ऋषभ पंत टीम इंडियात परतण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विकेटकिपर म्हणून बीसीसीआयने चाचपणी सुरु केली आहे. यात ईशान किशन आणि संजू सॅमसन हे दोन पर्याय टीम इंडियासमोर आहेत. ईशानने कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. तर संजू सॅमसने आयपीएलमध्ये सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण सध्यातरी इशान किशनचं पारडं जड आहे. 


गोलंदाजित प्रमुख गोलंदाज मोहम्द सिराज दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या गैरहजेरीत उमरान मलिकला संधी मिळू शकते. याशिवाय टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याची शक्यता आहे. 


संभ्याव प्लेइंग-11:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन/ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर, मुकेश कुमार, उमरान मलिक


हेड टू हेड रिकॉर्ड्स
भारत आणि  वेस्टइंडिजदरम्यान आतापर्यंत 139 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहे. यात भारतातने सर्वाधिक 70 सामन्यात विजय मिळवलाय. तर वेस्ट इंडिजने 63 सामने जिंकलेत. चार सामन्यांचा निकाल लागला नाही, तर दोन सामने टाय झालेत.


भारतात कुठे आणि कधी आहेत सामने
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. डीडी स्पोर्ट्सवर सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल तर जियो सिनेमावर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहात येणार आहे