बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा, `या` खेळाडूंना संधी
BAN vs IND : देशात सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. यादरम्यान बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 16 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत.
BAN vs IND T20 Series : देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची (IPL 2024) धुम सुरु आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत तीस सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएलनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळवला जाणार आहे. आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचंही लक्ष लागलं आहे.
भारतीय संघाची निवड
यादरम्यान बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 16 खेळाडूंच्या भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा (Indian Women Cricket Team) केली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची धुरा हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत-बांगलादेशदरम्यानच्या टी20 मालिकेला 28 एप्रिलपासून सुरुवात होईल. तर 9 मेला शेवटचा सामना खेळवण्या येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला संघ लवकरच बांगलादेशला रवाना होईल.
वुमन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयंका पाटीलला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.
28 एप्रिलपासून मालिकेला सुरुवात
भारत-बांगलादेशदरम्यानचा पहिला टी20 सामना 28 एप्रिलला सिलहट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमध्ये खेळवण्यात येणार आहेत. तर मालिकेतला दुसरा टी20 सामना 30 एप्रिल, तिसरा सामना 2 मे, चौथा सामना 6 मे आणि शेवटचा टी20 सामना 9 मेला खेळवण्यात येणार आहे. सर्व सामने सिलहट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमध्ये रंगणार आहेत.
टी20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला टी20 सामना : 28 एप्रिल, सिलहट इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
दूसरा टी20 सामना : 30 एप्रिल, सिलहट इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
तीसरा टी20 सामना : 2 मे, सिलहट इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
चौथा टी20 सामना : 6 मे, सिलहट इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
पाचवा टी20 सामना : 9 मे, सिलहट इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
टी20 मालिकेसाठी भारतीय महिला टीम
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधाक), शेफाली वर्मा, दयालन हेमलता, सजना सजीवन, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, श्रेयंका पाटिल, सैका इशाक , आशा शोभना, रेणुका सिंह ठाकुर, तितास साधु