IPL 2025 All 10 Teams Captain : इंडियन प्रीमिअर लीगचा नवा हंगाम सुरु व्हायला अद्याप बराच अवकाश आहे. पण नव्या हंगामाआधीच अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. आयपीएल 2025 (IPL 2025) साठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. त्याआधी आयपीएलमधल्या सर्व 10 संघांना रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसीलकडे सादर करायची आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जात आहे. आयपीएल 2025 मध्ये सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहा संघांचे कर्णधार बदलणार?
आयपीएल 2025 मध्ये दहा पैकी 6 संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याचं बोललं जात आहे. दाव्यानुसार मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधारपदावरुन हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) डच्चू दिला जाणार असून संघाची कमान पुन्हा रोहित शर्माच्या हाती सोपवली जाणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (RCB) धुरा पुन्हा एकदा विराट कोहलीकडे दिली जाणार आहे. 


याशिवाय लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघालाही नव्या हंगागमात नाव कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. यात राजस्थान रॉयल्सची जबाबदारी जोस बटलरकडे, लखनऊची जबाबदादारी निकोलस पूरनकडे, गुजरातची कमान राशिद खानकडे आणि पंजाब किंग्सची कमान नितीश राणाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. 


फ्रँचाईजीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
दरम्यान, सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांवर फ्रँचाईजीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सहा संघांचे कर्णधार बदलण्याचा केवळ दावा केला जात आहे. 


मुंबई इंडियन्स हार्दिकला डच्चू देणार
आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला सोडण्याची शक्यता आहे. सतराव्या हंगामात रोहित शर्माला हटवून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सची जबाबदारी सोपवली होती. पण हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला समाधानकारक कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे मुंबई इंडियन्स फ्रँचाईजी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयपीएल 2025 साठी डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. त्याआधी प्रत्येक संघाला केवळ 4 खेळाडू रिटेन करता येणार आहे. 


अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला नारळ देऊ शकतं. रिटेन करणाऱ्या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या चार खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. 
गेल्या हंगामात पांड्याला झालेली ट्रोलिंग आणि कॅप्टन्सीमध्ये चमक दाखवता न आल्याने फ्रँचायझी कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलं आहे.