चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, एमएस धोनी आयपीएलच्या पुढच्या हंगामाला मुकणार? CEO च्या वक्तव्याने चाहते हैराण
IPL 2025 : बीसीसीआयनत आयपीएल 2025 साटी रिटेंशन नियमांची घोषणआ केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजना रिटेन खेळाडूंची यादी बीसीसाआयकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयच्या एका नियमाचा चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
IPL 2025 Chennai Super Kings : बीसीसीआयने आयपीएल 2025 साठी रिटेंशन नियमांची (Retention Rule) घोषणा केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजींना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसीलकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयचा (BCCI) एक नियम चेन्नई सुपर किंग्ससाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बीसीसीआयने एका जुना नियम पुन्हा लागू केला आहे. याचा फायदा चेन्नई (Chennai Super Kings) संघाला होऊ शकतो.
आयपीएलचा खास नियम
बीसीसीआयच्या नियमानुसार एखादा खेळाडू गेल्या पाच वर्षात भारतासाठी एकही सामना खेळला नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू मानलं जाईल. अशात त्या खेळाडूची किंमत कमी होईल आणि फ्रँचाईजच्या पैशात बचत होऊ शकते. हा नियम चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर (Mahendrasingh Dhoni) लागू होऊ शकतो. एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जुलै 2019 मध्ये तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
धोनीला लागू होतो नियम
बीसीसीआयच्या या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्स अवघ्या 4 कोटी रुपयात एमएस धोनीला आपल्या संघात घेऊ शकते. धोनी आयपीएलमध्ये फारतर पुढचा आणखी एक हंगाम खेळण्याची शक्यता आहे. अशात स्वत: धोनीला संघाने आपल्यावर जास्त पैसे खर्च असं वाटू शकतं. पण एक मात्र नक्की की हा नियम लागू झाल्याने धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळण्याची शक्यता वाढली आहे. पण चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या एका वक्तव्याने चाहत्यांना हैराण केलं आहे.
सीएसकेच्या सीईओचं हैराण करणारं वक्तव्य
टाईम ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीती चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी 'या नियमाचा वापर धोनीसाठी करण्याबाबत विचार केला नसल्याचं' म्हटलं आहे. यावर बोलणं आता खूप घाईचं होईल, आम्ही धोनीबरोबर अद्याप चर्चा केलेली नाही. धोनी अमेरिकेत होात, येणाऱ्या काही दिवसात धोनीबरोबर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी आम्हाला इतकाच आशावाद आहे की धोनी पुढचा हंगाम खेळले. पण सर्वस्वी त्याचा निर्णय असेल' असंही विश्वनाथान यांनी म्हटलं आहे.
आयपीएलचा नियम काय सांगतो?
आयपीएलच्या नियमानुसार गेल्या पाच वर्षात खेळाडू एकही आंतरराष्ट्रीय म्हणजे कसोटी, एकदिवसीय किंवा टी20 सामना खेळला नसेल किंवा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग नसेल तर तो खेळाड अनकॅप्ड ठरतो. भारतीय खेळाडूंनाही हा नियम लागू होतो.