श्रीलंका मालिकेच्या आधी बोर्डाचा मोठा निर्णय, ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं संघाचं नेतृत्व
Ruturaj Gaikwad : भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या पहिल्या टी20 सामन्याला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांची मालिका असून यानंतर भारत आणि श्रीलंकादरम्यान 2 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
Ruturaj Gaikwad : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 27 जुलैला श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर हा सामना रंगणार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ तीन टी20 सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी20 मालिकेतील तीनही सामने पल्लेकेले मैदानावर खेळवले जाणार आहेत. तर त्यानंतर 2 ऑगस्टपासून भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. टी20 मालिकेपासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहे.
बोर्डाचा मोठा निर्णय
एकीकडे भारत-श्रीलंका टी20 सामन्याची उत्सुकता असताना दुसरीकडे महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. मराठमोठा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) महाराष्ट्र क्रिकेट संघाची धुराव सोपवण्यात आली आहे. 27 वर्षांच्या ऋतुराज गायकवाडला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात संधी देण्यात आली होती. पण श्रीलंका दौऱ्यात त्याची निवड करण्यात आली नाही. आता त्याच्यावर महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. रणजी ट्रॉफी 2024-25 साठी महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी ऋतुराजची निवड करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीत महाराष्ट्राचा पहिला सामना जम्मू-काश्मिरबरोबर आहे.
केदार जाधवची निवृत्ती
रणजी ट्ऱॉफीच्या गेल्या हंगामात केदार जाधवने महाराष्ट्र क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं. पण जून महिन्यात त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या आठवड्यात ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे रणजीचा पूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता. पण या हंगामात तो पूर्णपणे सज्ज झालाय.
ऋतुराजला डावललं
झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ पाच टी20 सामन खेळला. यात ऋतुरराज गायकवाड दमदार कामगिरी केली. पण यानंतरही ऋतुराजला श्रीलंका दौऱ्यातील टी20 संघात जागा देण्यात आली नाही. यावरुन सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोलही करण्यात आलं होतं.
टी20 क्रिकेटमध्ये ऋतुराजची कामगिरी
ऋतुराज गायकवाडने 2021 मध्ये टीम इंडियासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तो भारतासाठी 23 टी20 सामने खेळला असून यात त्याने 143.54 च्या स्ट्राईक रेटने 633 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व
ऋतुराज गायकवाडने एशियन्स गेम्समध्येही भारताचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वात भारताने सुवर्ण पदक पटाकवलं. तर 2024 च्या आयपीएल हंगामात एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडल्यानंतर ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेची धुरा देण्यात आली.सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचता आलं नाही. पण ऋतुराज गायकवाडने कर्णधार आणि फलंदाज म्हणून आपली छाप सोडली.