14 शतकं, 4 हजार धावांचं बक्षिस, सर्फराज खानसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले
Sarfaraz Khan : मुंबई क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सर्फराज खानने गेल्या 3-4 वर्षात स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचला. पण यानंतरही त्याला टीम इंडियात संधी मिळाली नव्हती. पण आता मोठ्या प्रतीक्षेनंतर सर्फराज खानसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत.
Sarfaraz Khan : क्रिकेटचा जन्म भारतात झाला नाही पण आज क्रिकेट हीच भारताची ओळख बनला आहे. क्रिकेट म्हणजे भारतात धर्म बनला आहे. प्रत्येक पालक आपला मुलगा देशासाठी खेळावा याची स्वप्न बघतो. देशात स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धा (Ranji Trophy) ही मानाची समजली जाते. या स्पर्धेतूनच टीम इंडियाचे (Team India) दरवाजे उघडले जातात. पण रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत गेल्या तीन वर्षांपासून एक युवा फलंदाज धावांची बरसता करत आहे. स्वप्न फक्त एकच या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात संधी मिळेल. पण दमदार कामिगीरनंतरही बीसीसीआयकडून (BCCI) या खेळाडूकडे सातत्याने दुर्लक्षच करण्यात आलं.
अखेर न्याय मिळाला
रणजी ट्ऱॉफी स्पर्धेत रन मशिन (Run Machine) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युवा फलंदाजाचं नाव आहे सर्फराज खान (sarfaraz khan).पण रणजी ट्ऱॉफी स्पर्धेत धावांचा डोंगर रचूनही सर्फराजसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले नव्हते. पण मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर बीसीसीआयकडून सर्फराज खानच्या नावाचा विचार झालाय. सर्फराज खानला बीसीसीआयकडून बोलावणं आलं आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय निवड समितीने सर्फराजचा भारतीय संघात समावेश केला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्फराजच्या नावावर 14 शतकं आणि 4 हजार धावा जमा आहेत.
जडेजा-राहुल बाहेर
पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध पराभवा स्विकाराव्या लागणाऱ्याला टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला. ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि स्टार फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. विशाखापट्टनममध्ये दोन फेब्रुवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या दोघांच्या बाहेर जाण्याने टीम इंडियाला मोठा फटका बसणार आहे. त्यांच्या जागी तीन खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांना संघात संधी दिली आहे.
टीम इंडियामध्ये पहिल्यांदाच संधी
सर्फराज खानला टीम इंडियात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. मुंबईकर सर्फराज खानने स्थानिक क्रिकेटमध्ये धावांची बरसात केली आहे. पण बीसीसीआयकडून त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आलं. इंडिया ए संघात त्याची निवड झाली होती. पण त्याची कामगिरी खराब असल्याचं कारण देत बीसीसीआयने सर्फराजला संधी दिली नाही. पण यापुढच्याय सामन्यात इंडिया ए कडून खेळताना सर्फराजने इंग्लंड लायन्सविरुद्ध 161 धावांची खेळी करत उत्तर दिलं.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रेकॉर्ड
सर्फराजने आतापर्यंत 36 फर्स्ट क्रिकेट सामान्यात 80 च्या स्ट्राईक रेटने 3380 धावा केल्या आहेत. यात 14 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 301 नाबाद ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याची धावा करण्याची त्याची क्षमता आणि संयम कसोटी क्रिकेटसाठी एकदम योग्य असल्याचं दिग्गज क्रिकेटरही मान्य करतात. 12 वर्षांच्या सर्फराजने 2009 मध्ये हॅरिस शील्ड ट्रॉफी स्पर्धेत 439 धावांची खेळी केली होती. याच खेळीमुळे तो रातोरात स्टार झाला होता.