Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचं अखेर पदार्पण, Playing XI मध्ये समावेश
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीनंतर Arjun Sachin Tendulkar चं नशीब अखेर उघडलं, अंतिम अकरा खेळाडूंमध्ये झाली निवड
Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) अखेर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First Class Cricket) पदार्पण केलं. आहे. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यात अर्जुनत तेंडुलकर गोवा क्रिकेट संघाकडून (Goa Cricket Team) खेळण्यास उतरला. अर्जुन तेंडुलकरने मुंबई सोडल्यानंतर गोवा क्रिकेट संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
गोव्यात खेळल्या जाणाऱ्या गोवा आणि राजस्थान (Goa vs Rajasthan) दरम्यानच्या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात गोवा क्रिकेट संघाने अंतिम अकरा खेळाडूंमध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी दिली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी अर्जुन तेंडुलकरला फलंदाजीची संधी मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अर्जुन तेंडुलकर 4 धावांवर नाबाद होता.
पहिल्या दिवस अखेर गोवा क्रिकेट संघाने 5 विकेट गमावत 210 धावा केल्या आहेत. गोवा संघातर्फे सुयशने सर्वाधिक 81 धावा केल्या असून तो नाबाद आहे. तर स्नेहलने 59 धावा केल्या.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अर्जुन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) मुंबई क्रिकेट सोडण्यासाठी अपील केलं होतं. मुंबई संघाकडून खेळण्याची संधी मिळत नसल्याने अर्जुन तेंडुलकरने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. आता रणजी क्रिकेट स्पर्धेतून अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
आयपीएलमध्येही खेळण्याची संधी नाही
आपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स (Mumbai Indiance) संघाचा खेळाडू आहे. पण गेल्या दोन हंगामात त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळालेली नाही. पहिल्या हंगामात अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपये, तर दुसऱ्या हंगामात 30 लाख रुपयांचा करारासह मुंबई इंडियन्स आपल्या संघात घेतलं होतं.