Ind vs Ban मॅचदरम्यान पेटपूजा सुरु असताना अचानक कॅमेरा आला अन्...; BCCI उपाध्यक्ष क्लिन बोल्ड; Video Viral
IND VS BAN Rajeev Shukla Viral Video : चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी इतर प्रेक्षकांप्रमाणेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.
IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथे दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी इतर प्रेक्षकांप्रमाणेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. सध्या एक व्हिडीओ समोर येत असून यात राजीव शुक्ला सामना एन्जॉय करताना काहीतरी खात होते तेवढ्यात कॅमेरामॅनने त्यांच्याकडे कॅमेरा फिरवला. यावेळी ते थोडे चिडलेले दिसले.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर 27 सप्टेंबर पासून दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. सुरुवातीचे तीन दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या आणि तिसर्या दिवशीचा खेळ होऊ शकला नव्हता. तर पहिल्या दिवशी फक्त 35 ओव्हरचा खेळ झाला ज्यात बांगलादेशने 107 धावा करून 2 विकेट्स गमावले होते. चौथ्या दिवशी पाऊस थांबून सामान सुरु झाला यावेळी टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी स्टेडियवर उपस्थित होते.
राजीव शुल्कांचा व्हायरल व्हिडीओ :
राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष असून ते सोमवारी कानपुर टेस्ट पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होते. सामना पाहण्यासाठी बसलेले शुक्ला हे काहीतरी खात असताना कॅमेरामॅनने त्यांच्यावर कॅमेरा फिरवला. यावेळी राजीव शुक्ला खात होते. कॅमेरा त्यांच्याकडे आहे असे कळताच त्यांनी चमचा बाजूला ठेवला. यावेळी शुक्ला यांच्या समोरून एक मुलगा जाताना दिसतो ते त्याच्यावरही भडकतात. सर्व प्रकारामुळे राजीव शुल्का नाखुश दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध कमेंट्स करत आहेत. यापूर्वी सूर्यकुमार यादवचा सुद्धा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता.
हेही वाचा : क्रिकेट फॅन्ससाठी ब्लॉकबस्टर ऑक्टोबर, वर्ल्ड कप खेळणार टीम इंडिया, पाकिस्तानसोबत होणार मुकाबला
चौथ्या दिवशी काय घडलं?
चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी बांगलादेशची टीम फलंदाजी करताना टीम इंडियाने त्यांना 233 धावांवर रोखले. यावेळी जसप्रीत बुमराहने बांगलादेशच्या सर्वाधिक 3, मोहम्मद सिराज, आर अश्विन, आकाश दीप यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर जडेजाने एक विकेट घेतली. टीम इंडियाने फलंदाजी करताना बांगलादेशची आघडी मोडीत काढून 285 धावा केल्या. परंतु 9 विकेट्स गेल्यावर रोहितने फलंदाजांना बोलावून घेतले त्यामुळे 285 धावांवर खेळ आटोपला. यावेळी भारताने अवघ्या 52 धावांची आघाडी घेतली होती तर चौथ्या दिवसाअंती बांगलादेशने पुन्हा फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावून 26 धावा केल्या.