IND VS NZ 1st Test, Rachin Ravindra : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याचा तिसरा दिवस शुक्रवारी पार पडत असून यात भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र याने टीम इंडिया विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं. भारतात केललं रचिनचं हे दुसरं शतक होतं. यासह किवी टीमने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारताला 46 धावांवर ऑल आउट करून दिवसाअंती फलंदाजी 3 विकेट्स गमावून 180 धावा करत 134 धावांची आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला रवींद्र जडेजाने न्यूझीलंडच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेऊन सामन्यात टीम इंडियाचा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रने मैदानात दमदार फलंदाजी करून टीम इंडियाच्या गोलंदाजांना रडवलं. 


हेही वाचा : IPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? लिस्ट आली समोर


पाहा व्हिडीओ 



रचिन रवींद्रचं शतक : 


दुसऱ्या दिवशी विल याँग बाद झाल्यावर ऑल राउंडर रचिन रवींद्र मैदानात आला. रचिन रवींद्र हा मूळ भारतीय वंशाचा असून त्याचं कुटुंब हे न्यूझीलंडमध्ये स्थायिक आहे. तर त्याचे आजी आजोबा हे अजूनही भारतात राहतात.  रचिन रवींद्रने तिसऱ्या दिवशी मैदानात टिकून राहत दमदार खेळी केली. त्याने 13 चौकार आणि 4 षटकांच्या मदतीने 134 धावा केल्या. रचिनच्या या खेळीमुळे न्यूझीलंडची टीम भारताविरुद्ध 402 धावांचा डोंगर उभारू शकली. न्यूझीलंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 356 धावांची आघाडी घेतली. 


कोण आहे रचिन रवींद्र? 


रचिन रवींद्र याचा जन्म 18 नोव्हेंबर 1999 रोजी न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे झाला. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. वडील मूळ कर्नाटकातील बेंगळुरूचे असून ते 90 च्या दशकात न्यूझीलंडला गेले आणि तेथेच रचिनचा जन्म वेलिंग्टनमध्ये झाला. एप्रिल, 2021 मध्ये रचिन रवींद्रने  इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट दौऱ्यात न्यूझीलंड संघातून पदार्पण केले. वर्ल्ड कप 2023 मध्ये रचिन भारतात आला होता त्यावेळीही त्याने शतक ठोकले होते. आयपीएलमध्ये रचिन रवींद्र हा चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळतो. रचिनचे वडील रवी यांनी सांगितल्यानुसार रचिनचे नाव त्यांनी भारताचे दिग्गज क्रिकेटर 'सचिन' आणि 'राहुल ' यांच्या नावांचं कॉम्बिनेशनवरून 'ठेवण्यात आलं आहे.