Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची वादळी खेळी, चौकार-षटकारांची आतषबाजी
Road Safety World Series: सचिन तेंडुलकरला निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. पण ना त्याच्या बॅटची धार गेली आहे, ना चाहता वर्ग. डेहराडूनमध्ये या महान फलंदाजाने 200 च्या स्ट्राईक रेटने तुफानी खेळ केला आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
India Legends vs England Legends: महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लेजेंड्सने Road Safety World Series मध्ये इंग्लंड लिजेंड्सचा 40 धावांनी पराभव केला. डेहराडूनमध्ये पावसाचा व्यत्ययामुळे हा सामना 15-15 षटकांचा करण्यात आला. सचिन तेंडुलकर याच्या टीमने 15 षटकांत पाच गडी गमावून 170 धावा केल्या. यानंतर इंग्लंड लीजेंड्स संघाला सहा विकेट्स गमावून केवळ 130 धावा करता आल्या. सचिन तेंडुलकरने वयाच्या 49 व्या वर्षीही तुफानी इनिंग खेळून भारताला विजय मिळवून दिल्याने त्याच्या खेळाची जोरदार चर्चा सुरु आहे.
सचिन सामनावीर ठरला
Road Safety World Seriesच्या या 14 व्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने (India Legends ) दमदार कामगिरी केली. तुफानी शैलीत खेळत सचिनने 20 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने या खेळीत तीन चौकार आणि तब्बल षटकार मारले. त्याचवेळी युवराज सिंगने 15 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकार लगावत नाबाद 31 धावांचे योगदान दिले. इंग्लंड लिजेंड्स संघाकडून स्टीफन पेरीने तीन बळी घेतले. सचिनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारतीय संघाची मोठी सुरुवात
डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना India Legends संघाने धमाकेदार सुरुवात केली आणि 5.3 षटकात 65 धावा केल्या. सचिन आणि यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ओझाला पॅरीने बाद करुन ही भागीदारी मोडीत काढली. सचिन आणि युवीशिवाय युसूफ पठाणनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने 11 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकार मारत 27 धावा केल्या.
सचिनने 7 गोलंदाज खेळवले
सचिन तेंडुलकर याच्या टीम इंडिया लीजेंड्सने (India Legends) सात गोलंदाजाना खेवळवले गेले.. राजेश पवार, स्टुअर्ट बिन्नी, प्रज्ञान ओझा आणि मनप्रीत गोनी यांना यश मिळाले. पवारांनी तीन षटकांत अवघ्या 12 धावा देत तीन बळी घेतले. बिन्नी, ओझा आणि मनप्रीत गोनी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.