मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी -२० मालिका स्पर्धा सुरु आहेत. दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत. टी -२० नंतर हे दोन्ही संघ तीन वनडे (Oneday) सीरीज खेळणार आहेत. या सीरीजसाठी लवकरच टीम इंडियाच्या Playersची घोषणा केली जाईल. टी -२० प्रमाणेच वन डे मध्येही नवीन चेहर्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या सीरीजमध्ये कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसाद कृष्णा  (Prasidh Krishna) आणि बडोदा अष्टपैलू क्रृणाल पंड्या (Krunal Pandya) यांना संधी मिळू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच वेगवान बॅालर जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा अद्याप टीममध्ये परतलेले नाही, हे दोघे आत्ता टीम इंडियापासून दूर राहतील.


क्रिकबझच्या रिपोर्टनुसार,  प्रसाद कृष्णा  (Prasidh Krishna) प्रथमच भारतीय टीममध्ये स्थान मिळवू शकेल. नुकताच त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 14 विकेट्स घेतले आहेत. तो आयपीएलमध्ये (IPL) कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. कृष्णा बरोबरचं वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed siraj), नवदीप सैनी (Navdeep Saini), शार्दुल ठाकुर (Shardul thakur), टी नटराजन (T Natarajan) आणि भुवनेश्वर कुमार(Bhuvneshwar Kumar) यांना निवडले जाण्याची शक्यता आहे.


लग्नामुळे बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती मिळू शकते. त्यांचे नुकतेच15 मार्च रोजी लग्न झाले. यासाठी शेवटच्या कसोटी आणि पाच सामन्यांच्या टी -20 सीरीजमधुनही त्याला सुट्टी देण्यात आली आहे


क्रृणाल पांड्या पहिल्यांदा एकदिवसीय संघात येणार!


तीन एकदिवसीय सामन्यांसाठी 18 सदस्यीयांची निवड केली जाईल. त्याअंतर्गत क्रृणाल पांड्या पहिल्यांदाच एकदिवसीय संघात येऊ शकतो. तो भारताकडून टी -20 खेळला आहे. पांड्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी केली होती. यामध्ये त्याने दोन नाबाद शतके आणि दोन अर्धशतके झळकावली.


परंतु पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal)यांची संघात निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे. या दोघांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.


जडेजा परत येणार नाही


रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती घेण्यास सांगितले जाऊ शकते अशी चर्चा होती, परंतु आता असे होणार नाही. बॅटिंगमध्ये आपल्याला फारसा बदल पहायला मिळणार नाही. बहुतेक तुम्हाला तेच चेहरे पाहायला मिळतील जे सध्या टी -२० मालिकेचा भाग आहेत.


त्याचबरोबर, रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) सध्या टीम इंडियामध्ये निवड होणार नाही. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीमच्या बाहेर आहे. त्याने आता सराव सुरू केला आहे, पण संघ व्यवस्थापन त्यांला टीममध्ये घेण्यासाठी घाई करत नाहीत.


भारत आणि इंग्लंडमधली ही वनडे सीरीज पुण्यात खेळली जाईल आणि या मॅच 23, 26 आणि 28 मार्च ला खेळल्या जातील.