Salil Ankola Mother Death : भारताचा माजी क्रिकेटर आणि अभिनेता सलील अंकोला याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सलीलच्या आईचा शुक्रवारी पुण्यात राहत्या घरी मृत्यू झाला. माला अंकोला यांचा पुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु  उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. माला अंकोला यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला. 


माला अंकोला यांचा संशयास्पद मृत्यू : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी क्रिकेटर सलील अंकोला यांची आई माला या पुण्यात आपल्या मुलीकडे राहत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामवाली बाई घरी आली असताना दरवाजा बंद होता. माला या दरवाजा उघडत नसल्याचे मुलीला फोन करून कळवले. यावेळी माला यांच्या मुलीने आपल्या वडिलांना घरी जाण्यास सांगितले. वडील घरी आले आणि त्यांनी दरवाजा उघडताच माला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या गळ्यावर वार केल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे ही नेमकी हत्या आणि की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत. घरात कोणी नसताना ही घटना घडली असून माला या मानसिक आजारी होत्या अशी माहिती मिळत आहे. 


हेही वाचा : 'कोहलीने टीममध्ये आग लावली', विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?


 


कोण आहे सलील अंकोला?


सलील अंकोला हा भारताचा माजी क्रिकेटर असून त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात 20 वनडे आणि १ टेस्टमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सलील अंकोला हा ऑल राउंडर क्रिकेटर असून त्याने वनडे क्रिकेटमध्ये 34 धावा आणि 13 विकेट्स घेतले. तर एका टेस्ट सामन्यात त्याने २ विकेट्स आणि 6 धावांची कामगिरी केली होती. वयाच्या 28 व्या वर्षी सलीलने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सलील अंकोलाने बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे.