New Zealand Captain Resigns: भारत विरुद्ध बांगलादेश (India VS Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज पारपडली. या सीरिजमध्ये आधी चेन्नई आणि मग कानपूर येथे झालेला टेस्ट सामना जिंकून टीम इंडियाने (Team india) 2-0 ने आघाडी मिळवत सीरिज जिंकली. टीम इंडिया यानंतर आता बांगलादेश विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 सीरिज आणि न्यूझीलंड विरुद्ध (India VS New Zealand) घरच्या मैदानावर 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळेल. परंतु त्यापूर्वी न्यूझीलंडच्या टेस्ट संघात मोठे बदल झाले असून त्यांच्या कॅप्टनने राजीनामा दिला आहे. 


साउदीने दिला कॅप्टनपदाचा राजीनामा : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड ऑक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असून यापूर्वी त्यांच्या संघात मोठे बदल झाले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन दिवसांपूर्वी टेस्ट सिरीज खेळवण्यात आली होती. या सीरिजमध्ये श्रीलंकेने बलाढय न्यूझीलंडला धूळ चारून 2-0 ने आघाडी घेऊन सीरिज नावावर केली. या पराभवानंतर न्यूझीलंडच्या टेस्ट संघाचा कॅप्टन  टिम साउदी याने राजीनामा दिला आहे. साउदीच्या राजीनाम्यानंतर ओपनिंग बॅट्समन टॉम लाथम यांच्याकडे न्यूझीलंड टेस्ट संघाचे पूर्णकालीन कॅप्टनपद सोपवण्यात आले आहे. यापूर्वी टॉम लाथमने 9 टेस्ट मध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व केलं होतं. न्यूझीलंड क्रिकेटने स्वतः याबाबत माहिती दिली. 


साउदीने का सोडली कॅप्टन्सी?


साउदीने कॅप्टन्सी सोडल्यावर सांगितले की त्याने संघाच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याने म्हंटले, 'एक अशा फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व करणं जो माझ्यासाठी खूप खास आहे. तो एक सन्मान आहे. मी नेहमी माझ्या करिअरमध्ये माझ्या संघाला प्रथम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि माझं म्हणणं आहे की, हा संघासाठी सर्वोत्तम निर्णय आहे. माझ्या खेळावर लक्ष देऊन मी संघाची सर्वात चांगली सेवा करू शकतो'. 



हेही वाचा : टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी अनुभवी गोलंदाजाला दुखापत


कधी होणार भारत - न्यूझीलंड सीरिज? 


न्यूझीलंडचा संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज होणार असून 16 ऑक्टोबर पासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. पहिला टेस्ट सामना हा 16 ते 20ऑक्टोबर दरम्यान चिन्नस्वामी स्टेडियमवर पार पडेल. तर दुसरा टेस्ट सामना हा 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात होईल आणि तिसरा टेस्ट सामना हा 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडेल.