वीरेंद्र सेहवाग - सचिन तेंडुलकरची तुफान फटकेबाजी, चौकार-षटकारांची आतषबाजी
बऱ्याच दिवसानंतर टीम इंडियाची सर्वोत्तम सलामीवीर जोडी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर मैदानात दिसली. क्रिकेट प्रेमींना त्यांच्या चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.
मुंबई : बऱ्याच दिवसानंतर टीम इंडियाची सर्वोत्तम सलामीवीर जोडी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर मैदानात दिसली. त्यांनी इंडिया लीजेंड्स (India Legends) विरुद्ध बांग्लादेश लेजेंड्स (Bangladesh Legends) यांच्यात झालेल्या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत हा सामना सहज खिशात टाकला. दोन्ही सलामीचे फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिले. यावेळी दोघांनी जोरदार फलंदाजी केली. क्रिकेट प्रेमींना या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.
छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते मालिकेचा शुभारंभ करण्यात आला. या मालिकेत भारत, बांग्लादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे खेळाडू सहभागी झाले आहेत. छत्तीसगडमधील Chhattisgarh) शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Shaheed Veer Narayan Singh International Stadium) वर इंडिया लीजेंड्स (India Legends) विरुद्ध बांग्लादेश लेजेंड्सचा (Bangladesh Legends) पहिला सामना झाला.
सचिनची एक झलक
वीरेंद्र सेहवागसह (Virender Sehwag) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) हा सामना सहज जिंकला. त्याने 26 चेंडूत 33 नाबाद धावा केल्या. या दरम्यान त्याने 5 चौकार ठोकले. सचिनची एक झलक पाहायला प्रेक्षक पूर्णपणे उत्सुक झाले होते आणि स्टेडियममध्ये त्याच्या नावाचे फलकही दिसत होते. सचिनच्या नावाने जल्लोष पाहायला मिळाला.
सचिन-सेहवागज शेवटपर्यंत नाबाद
इंडिया लीजेंड्सला (India Legends) 110 धावांचे सोपे टार्गेट ठेवण्यात आले होते. यजमान इंडिया लीजेंड्सच्यावतीने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने (Virender Sehwag) एक शानदार खेळी केली. त्यांनी 10.1 षटकांत 114 धावा करून हा सामना जिंकला. सचिन आणि वीरेंद्र सेहवागज शेवटपर्यंत नाबाद राहिले.
वीरेंद्र सेहवागचे जोरदार षटकार
वेगवान डाव खेळताना इंडिया लेजेंड्सचा (India Legends) सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) फक्त 35 चेंडूंत 80 नाबाद धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला आणि यजमान संघाने हा सामना 10 गडी राखून जिंकला.