टीम इंडियासाठी खूशखबर, इंग्लंडचा हा धोकादायक गोलंदाज कसोटी मालिकेत असणार नाही
England Test Series : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान (Test Series) टीम इंडियाला (Team India) एक दिलासादायक बातमी मिळत आहे.
मुंबई : England Test Series : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान (Test Series) टीम इंडियाला (Team India) एक दिलासादायक बातमी मिळत आहे. इंग्लंडचा (England) धोकादायक वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यापुढे संपूर्ण कसोटी मालिकेत (Test Series) खेळताना दिसणार नाही. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या पायाच्या नळीला गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो यापुढे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही.
टीम इंडियासाठी चांगली बातमी
इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी एक निवेदन जारी केले, 'वेगवान गोलंदाज ब्रॉडला उजव्या पायाच्या नळीला मोठी दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्याने बुधवारी लंडनमध्ये एमआरआय स्कॅन केले, ज्यामध्ये पाणी दिसून आले आहेत.
या कसोटी मालिकेत हा धोकादायक गोलंदाज नाही
35 वर्षीय वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड, ज्याने 149 कसोटी सामन्यांमध्ये 524 विकेट्स घेतल्या आहेत, त्याला मंगळवारी लॉर्ड्स येथे सरावादरम्यान दुखापत झाली. इंग्लंडने याआधीच ब्रॉडचे कव्हर म्हणून वेगवान गोलंदाज साकिब महमूद याला बोलावले आहे. ब्रॉड व्यतिरिक्त जेम्स अँडरसन याच्या उपलब्धतेवरही शंका आहे.
ख्रिस वोक्स दुखापतीतून सावरू शकला नाही
पहिल्या कसोटी दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक बळी घेणारा अँडरसन बुधवारी सकाळी थाईच्या तणावामुळे प्रशिक्षण हंगामाला मुकला. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे इंग्लंड संघात आधीच वेगवान गोलंदाजी खेळत नाहीत. या व्यतिरिक्त, ख्रिस वोक्स देखील दुखापतीतून सावरू शकला नाही आणि ऑली स्टोन देखील दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाबाहेर आहे.