Indian Cricket Team : टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट सामान्यांची सीरिज मंगळवारी 2-0 ने आघाडी घेऊन जिंकली. आता यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर यानंतर त्यांचे मुख्य टार्गेट हे नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असेल. परंतु यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी हा पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केलेले नाही. शमी बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु तसे झाले नाही. त्यानंतर शमी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु त्याला पुन्हा दुखापत झाल्याने तो या सीरिजचा भाग होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 


शमीला पुन्हा दुखापत : 


टाइम्स ऑफ इंडियाशी बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, "मोहम्मद शमीने गोलंदाजीची प्रॅक्टिस पुन्हा सुरु केली होती आणि लवकरच तो पुनरागमन करेल अशी शक्यता होती. परंतु त्याच्या गुडघ्याची दुखापत पुन्हा वाढली आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीने आकलन करत असून यात खूप वेळ लागू शकतो. मोहम्मद शमी भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडियाकडून खेळला नाही. त्याची डिसेंबर 2023 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध टेस्ट टीममध्ये निवड झाली होती मात्र मेडिकल टीमने त्याला खेळण्याची परवानगी दिली नाही. यानंतर शामिवर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. 


हेही वाचा : बापाचं काळीज! खूप वर्षांनंतर लेकीला पाहून मोहम्मद शमी भावूक, केली भरपूर शॉपिंग... Video व्हायरल


 


6-8 आठवड्यांसाठी बाहेर होऊ शकतो शमी : 


रिपोर्ट्सनुसार बंगळुरूच्या नेशनल क्रिकेट अकॅडमी (एनसीए) मध्ये रिहॅबिलिटेशन दरम्यान शमीच्या गुडघ्याची सूज वाढली आहे. यामुळे तो कमीत कमी सहा ते आठ आठवड्यांसाठी बाहेत होऊ शकतो. शमी पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलिया सीरिज जिंकण्यासाठी भारताने केलेली प्लॅनिंग प्रभावित होऊ शकते. शमीने फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर तो एनसीएमध्ये आहे. तो बंगळुरूसाठी रणजी ट्रॉफी खेळू शकतो अशी शक्यता होती.  


बुमराहला दिला जाऊ शकतो आराम : 


टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना विश्वास आहे की शमी ऑस्ट्रेलिया सीरिजपूर्वी फिट होऊ शकतो. तेव्हा शमी पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने जसप्रीत बुमराहला न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमधून आराम दिला जाऊ शकतो. त्याला ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी फ्रेश ठेवलं जाईल. वर्क लोड मॅनेजमेंट म्हणून बुमराहला न्यूझीलंड सीरिजमधून आराम दिला जाण्याची शक्यता आहे.