Virat Kohli Video Viral: टीम इंडिया T20 विश्वचषकासाठी सज्ज झाली आहे. त्याची तयारीही सुरु आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू सरावावर जास्त भर देताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा उद्या 16 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सज्ज असून या स्पर्धेसाठी कोणतीही कसर सोडत नाही. टीम इंडिया 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने सामन्याला सुरुवात करणार आहे. दरम्यान, विराट कोहली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


नेट सरावादरम्यान व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिटनेस आणि सरावाच्याबाबतीत विराट कोहली याची कोणीही बरोबरी करु शकत नाही आणि मैदानावर जास्तीत जास्त तयारी करणे त्याला आवडते, हे सर्वांनाच माहीत आहे. विराट जिममध्येही खूप घाम गाळतो, ज्याचे फोटो-व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो विराटच्या नेट-प्रॅक्टिसदरम्यानचा आहे. 


 प्रशिक्षक राहुल द्रविडला दिले उत्तर?
 
भारतीय संघ नुकताच पर्थमध्ये सराव सामना खेळला. यामध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया-इलेव्हन संघ त्याच्यासमोर होता. त्याच काळातील ही व्हिडिओ क्लिप आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट या व्हिडिओमध्ये WACA स्टेडियममध्ये नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मागून आवाज येतो - विराट तुझा वेळ संपला आहे. असेच या व्हिडिओ ऐकायला मिळत आहे.  प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला तसे सांगत आहेत. यावर विराट म्हणतो- हुडा (दीपक) आला तर मी निघून जाईन.



टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी


या T20 विश्वचषकात टीम इंडिया आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे, जो 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील संघाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या यजमानपदी T20 मालिकेत पराभूत केले. त्याचबरोबर पाकिस्तानने न्यूझीलंड आणि बांग्लादेशला हरवून तिरंगी मालिका जिंकली आहे.