डरबन :  भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमी टीमच्या युवा क्रिकेटरची चांगली खेचत असतो. पण आता तो विचित्र परिस्थिती अडकला आहे. रोहितने पोस्ट केलेल्या एका फोटोवर स्पिनर युजवेंद्र चहल याने रोहितची पत्नी रितिकावर एक कमेंट केली. पण रितिकानेही त्याचे शानदार उत्तर दिले. त्यानंतर फॅन्सच्या कमेंटचा पूर आला. 


रोहितची गोची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला ज्यात चहर आणि शार्दुल ठाकूर सोबत आराम करताना दिसत आहे. रोहितने कॅप्शनमध्ये लिहिले की ' अच्छे ट्रेनिंग सेशननंतर सवडीचे क्षण' रोहितने या फोटोमध्ये चहल आणि शार्दुलला टॅग केले. 


यानंतर चहलने मस्करी करत रोहितची पत्नी रितिकाला टॅग करत म्हटले, भाभी, जलन हो रही है क्या?" 


 



चहलचे प्रत्युत्तर 


चूप राहणार ती रितिका कुठे... तिने उत्तर देताना म्हटले, की ' हा तुम्ही माझ्या डोक्यात काय चाललं आहे, हे वाचू शकतात. त्यावर चहल चूप बसला नाही त्याने लिहिले की, भावाला आणि एक महिना लागेल टेक ऑफ करायला, तो पर्यंत मी त्याची काळजी घेईल.