भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर दिग्गज खेळाडूची मोठी घोषणा, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
Heinrich Klaasen Retires : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी एक सामना जिंकले. पण या मालिकेनंतर दिग्गज खेळाडूने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Heinrich Klaasen Retirement : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान नुकतीच दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. यातला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने (South Africa) जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) विजय मिळवला. हा सामना अवघ्या दोन दिवसात संपला. या मालिकेला दोन दिवस उलटत नाहीत तोच एका दिग्गज क्रिकेटपटूने मोठी घोषणा केली आहे. या खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासनने (Heinrich Klaasen) कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. सोमवारी एक निवेदन जारी करत क्लासनने अचानक निवृत्ती जाहीर केली.
32 वर्षांच्या हेनरिक क्लासन दक्षिण आफ्रिकेसाठी केवळ चार कसोटी सामने खेळला आहे. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत हेनरीक क्लासेनला दक्षिण आफ्रिका संघात संधी देण्यात आली नव्हती. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये क्लासनेन खेळणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या क्लासनने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. क्सालेन व्हाईट बॉल स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. 2023 मधअेय क्लासेनने 172 च्या स्ट्राईक रेटने धाव्या केल्या होत्या.
क्लासेनने काय म्हटलंय निवदेनात?
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने जारी केलेल्या निवदेनात हेनरिक क्लासेनने खूप विचार केल्यानंतर रेड बॉल क्रिकेटमधून सन्यास घेण्याचा निर्णय केल्याचं म्हटलं आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणं हा आपल्या आयुष्यातील सर्वात कठिण निर्णय होता. कसोटी क्रिकेट हे आपलं सर्वात आवडतं क्रिकेट असल्याचं क्लासेनने म्हटलंय. आतापर्यतचा प्रवास खूप चांगला होता आणि मला आनंद आहे की दक्षिण आफ्रिका संघाचं मला प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली.
बॅगी टेस्ट कॅप ही आपल्या आयुष्यातील सर्वात किमती भेट असल्याचंही क्लासनने म्हटलं आहे. माझ्या कसोटी कारकिर्दीत ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्या सर्वांचे धन्यवादही क्लासनने मानले आहेत.
क्लासेनची क्रिकेट कारकिर्द
दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेल्या चार कसोटी सामन्यात क्लासनने केवळ 13 च्या अॅव्हरेजने 104 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये क्लासेनची सर्वाधिक धावसंख्या केवळ 35 होती. 2019 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या क्लासेन 2023 मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये मात्रा क्लासेनने दमदार कामगिरी केली आहे. क्लासेनने 54 एकदिवसीय सामन्यात 1723 धावा केल्या आहेत. यात चार शतकांचा समावेश आहे. तर 43 टी20 सामन्यात त्याने 722 धावा केल्यात.