T20 World Cup : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जातेय. तर इथे भारतात नुकतीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) खेळवण्यात आली होती. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मुंबईने (Mumbai) या ट्रॉफीवर कब्जा केला. अंतिम सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशचा (Himachal Pradesh) तीन विकेटने पराभव केला. यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळायला गेलेला एक क्रिकेटपटू हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली (Delhi) क्रिकेट संघाचा खेळाडू वैभव कांडपाल (Vaibhav Kandpal) या हनीट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. क्रिकेटरचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. 


कोलकातामधल्या बागुईहाटी पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावर क्रिकेटर वैभव कांडपाल याच्याकडून लाखो रुपये वसूल केल्याची माहिती आहे. पैसे न दिल्यास त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्याची धमकी देत वैभवकडून लाखो रुपये उकळण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी शुभांकर बिश्वास, ऋषब चंद्रा आणि शिवा सिंह यांना अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी आणखी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 


हे ही वाचा: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! खराब फॉर्म नडला, टी20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडणार?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 नोव्हेंबरच्या रात्री वैभव कांडपालने तक्रार दाखल केली. वैभव कांडपाल 29 ऑक्टोबरला सय्यद मुश्ताक अली ट्ऱ़ॉफी स्पर्धा खेळण्यासाठी कोलकात्याला (Kolkata) आला होता. दिल्ली संघासाठी खेळणारा वैभव सॉल्टलेक (Salt Lake ) इथल्या एका हॉटेलमध्ये थांबला होता.  एक नोव्हेंबरला वैभव एका बस स्टॅंडवर उभा असताना तिथे चार तरुण आले आणि त्यांनी धमकावत वैभवला एका सुमसाम जागेवर नेलं. तिथे त्यांनी वैभवाला त्याच्या खासगी व्हिडिओबाबत सांगितलं आणि त्याच्याकडून 60 हजार रुपये, मोबाईल फोन आणि सोन्याची चैन घेतली. एका डेटिंग साईटवर वैभवची फसवणूक करण्यात आली होती.


पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांना यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याची माहिती दिली आहे.