T20 World Cup Live Streaming & Broadcast : टी20 वर्ल्ड कप 2024 येत्या 2 जूनपासून सुरु होतोय. यंदाची स्पर्धा वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत (America) खेळवली जाणर आहे. यासाठी दोन्ही यजमान देशांनी जय्यत तयारी केलीय. टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) अमेरिकेत नवं स्टेडिअम उभारण्यात आलं आहे. यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत तब्बल 20 संघांनी भाग घेतला असून पाच संघांचे चार ग्रुप बनवण्यात आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा ग्रुप ए मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारताशिवाय पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, यजमान अमेरिका संघांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठे पाहाता येणार सामना
टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. तर 9 जूनला टीम इंडियाला पांरपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करेल. 12 जूनला अमेरिकेशी तर 15 जूनला टीम इंडिया कॅनडाशी सामना करेल. टीम इंडियाचे सर्व सामने अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या नासऊ स्टेडिअममध्ये खेळवले जाणार आहे. 


भारतीयांना कुठे पाहाता येणार सामने?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच गेल्या 13 वर्षांचा आयसीसी जेतेपद पटकावण्याचा दुष्काळ संपवेल अशी करोडो भारतीयांना अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये स्पर्धेविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्यातच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी स्पर्धेआधी एक खुशखबर मिळाली आहे. टी20 वर्ल्ड कपचे सर्व सामने भारतीय क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या मोफत पाहाता येणार आहे. टी20 वर्ल्ड कपचे सर्व सामने डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत दाखवले जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी सब्सक्रिप्शन घेण्याचीही गरज नाही. 


याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यांचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केलं जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्स टी20 वर्ल्ड कप 2024 चे ऑफिशिअर ब्रॉडकास्टर आहेत. याशिवाय सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत पाहाता येणार आहे. 


15 खेळाडूंचा भारतीय संघ
टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आयपीएलनंतर टीम इंडियाचे खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी रवाना होतील. जे खेळाडू आयपीएल प्ले ऑफमध्ये खेळणार नाहीए ते खेळाडू आधीच रवाना होतील अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. 


टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उप-कप्तान), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज.