Indian Cricket Team T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 दरम्यान टी20 वर्ल्ड कपची जोरदार चर्चा सुरु आहे. आयपीएलनंतर 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. यासाठी येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची (Team India) घोषणा होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. यादरम्यान, भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाने (Virendra Sehwag) टी20 वर्ल्ड कपसाठी आपली प्लेईंग इल्वेहन (Playing Eleven) निवडली आहे. यात त्याने सर्वात मोठा बदल केला आहे तो म्हणजे वीरेंद्र सेहवानने ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकला बाहेरचा रस्ता
हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा प्रमुख ऑलराऊंडर खेळाडू आहे. पण आयपीएलच्या सतराव्या हंगामात त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मुंबई इंडियन्सची कमान सांभाळणाऱ्या हार्दिकला आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. ना गोलंदाजीत ना फलंदाजीत हार्दिक आपली छाप उमटवू शकलेला नाही. याच कारणामुळे सेहवागने हार्दिकला आपल्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं आहे. 


अशी आहे सेहवागची प्लेईंग इलेव्हन
वीरेंद्र सेहवागने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये पहिली संधी दिली आहे ती म्हणजे हिटमॅन रोहित शर्माला. रोहित शर्माला भारतीय डावाची सुरुवात करेल आणि त्याला साथ मिळेल ती युवा आक्रमक फलंजा यशस्वी जयस्वालची. तिसऱ्या क्रमांकावर स्टार आणि हुकमी खेळाडू विराट कोहलीला स्थान देण्यात आलं आहे. 


टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील नंबर वन फलंदाज सुर्यकुमार यादव फलंदाजीला उतरेल. यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार काहीच सामने खेळला आहे. पण त्याच्याकडे सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद आहे. पाचव्या क्रमांकासाठी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद सांभाळणारा ऋषभ पंतला निवडलं आहे. अपघातानंतर तब्बल 14 महिन्यांनी मैदानावर कमबॅक करणाऱ्या ऋषभने आयपीएलमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली आहे. 


नंबर सहावर फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या फलंदाजाची गरज असल्याने सेहवागने रिंकू सिंग आणि शिवम दुबेला पसंती दर्शवली आहे. नंबर सहावर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. असं सेहवागने म्हटलंय. 


अशी असेल गोलंदाजी
टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीची धुरा ऑलराऊंड रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव सांभाळतील. जडेजा टीम इंडियात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, तर आठव्या क्रमांकावर कुलदीप यादव फलंदाजीला उतरेल. वेगवान गोलंदाजीसाठी विरेंद्र सेहवागने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा यांना पसंती दिली आहे. 


टी20 वर्ल्ड कप सेहवागची टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्मधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे/रिंकू सिंह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा.