India vs Sri Lanka T20 : श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात विजय मिळवत भारताने (Team India) नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. आता भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा दुसरा टी20 (India vs Sri Lanka 2nd T20) सामना 5 जानेवारीला पुण्यात खेळवला जाणार आहे. पहिला सामना जिंकात टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला सामन्यातून काहीवेळ बाहेर पडालं लागलं होतं. आता भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टी20 सामन्यातून बाहेर?
भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर संजू सॅमसनला दुखापत झाली आहे, त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजू सॅमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. या कारणामुळे तो टीम इंडियाबरोबर पुण्यात गेलेला नाही. संजू सॅमसन (Sanju Samson) मुंबईतच उपचार घेण्यासाठी थांबला आहे. 


कशी झाली दुखापत?
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एक कॅच पकडताना संजू सॅमसनने झेप घेतली आणि तो पायावर आपटला, त्यानंतर चालताना त्याला दुखापत जाणवत होती. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला मोठी कामगिरी करता आलेली नाही. केवळ 5 धावा करुन तो बाद झाला. पण आता दुसऱ्या सामन्यातू संजू सॅसमन बाहेर पडला तर त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार याची क्रिकेट चाहत्यंना उत्सुकता आहे. 


हार्दिक पांड्याही दुखापतग्रस्त?
टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याही दुसऱ्या टी20 सामन्यात खेळणार की नाही याचा सस्पेन्स कायम आहे. भानुका राजपक्षेचा कॅच पकडताना हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला (Hardik Pandya's leg sprained) होता. त्यानंतर त्याने कर्णधारपदाची जबाबदारी सुर्यकुमारकडे सोपवली. सामन्याच्या 15 ओव्हरमध्ये हार्दिकने पुन्हा मैदानात कमबॅक केलं होतं. अखेरची ओव्हर हार्दिक करेल, अशी अपेक्षा असताना अक्षरकडे (Axar Patel) बॉल सोपवण्यात आला होता. त्यामुळे हार्दिकची दुखापत गंभीर (Hardik Pandya's injury) असल्याचं जाणवत होतं. 


हे ही वाचा : शिट्टी मारतो... छेड काढतो... सिल्लोडमधल्या त्या तरुणाच्या खूनाचं रहस्य उलगडलं


भारतीय टी20 संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड,  शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉश्गिंटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार


भारत-श्रीलंका टी-20 सीरीज़
पहिली टी-20: भारत 2 धावांनी विजयी
दूसरा टी-20: 5 जानेवरी, पुणे
तीसरा टी-20: 7 जानेवरी, राजकोट