Mohammad Shami: आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने खळबळजनक दावे केले होते. रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याआधी कसा संघर्ष करावा लागला, तसंच 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये गुडघ्याला सूज आली असतानाही इंजेक्शन घेऊन खेळल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला होता. आता पुन्हा एकदा शमी चर्चेत आला आहे. मोहम्मद शमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भाजप नेत्यांबरोबर चर्चा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून मोहम्मद शमी (Mohammad Shami) राजकारणता एन्ट्री करणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत उत्तराखंडचा पारंपारीक सण ईगासचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप नेते अनिल बलूनी यांनी आपल्या निवसस्थानी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमााला गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, बॉलिवूड गायक जुबिन नौटियाल आणि टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी उपस्थित होते. यावेळी मोहम्मद शमीने गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी फोटोही काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


अमरोहात क्रिकेट स्टेडिअम
नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी विश्वकपमधल्या दमदार कामगिरीचा सन्मान म्हणून मोहम्मद शमीच्या अमरोहा जिल्ह्यात क्रिकेट स्टेडिअम बनवण्याची घोषणा केली होती. 



पंतप्रधान मोदींनी घेतली गळाभेट
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला. या सामन्याला पीएम मोदी  (PM Narendra Modi) यांनीही उपस्थित लावली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर पीएम मोदी यांनी स्वत: खेळाडूंची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी पीएम मोदी यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा या सर्व खेळाडूंची घेट घेतली. तसंच संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा केली. पण या भेटीत सर्वाधिक चर्चा झाली ती मोहम्मद शमीची. पीएम मोदी यांनी मोहम्मद शमीला मिठी मारली आणि त्याला धीर दिला. या गळाभेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. 


शमीची विश्वचषकात दमदार कामगिरी
मोहम्मद शमीने विश्वचषक स्पर्धेत आपल्या भेदक गोलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. अवघ्या सात सामन्यात शमीने 24 विकेट घेतल्या. तीन वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी त्याने केली. यात एकदा सात विकेट घेण्याच्या विक्रमाचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये शमीने तब्बल सात विकेट घेतल्या होत्या. वर्ल्डकपच्या इतिहासत शमी सर्वाधिक वेगवान 50 विकेट घेणारा भारतीय गोलंदाजही ठरला आहे.