Jasprit Bumrah : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) खेळवली जातेय. या सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) चार वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरली आहे. पण चाहत्यांना उणीव जाणवतेय ती टीम इंडियाचं प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah). बुमराह दुखापतग्रस्त असून सध्या तो दुखापतीवर उपचार घेत आहे. मोठ्या काळापासून बुमराह टीमपासून दूर आहे. या दरम्यान जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर (Social Media) केलेली एक व्हायरल झाली आहे. निवृत्तीच्या निर्णयावर बुमराहने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट (Emotional Post) शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमरहाची भावनिक पोस्ट
फुटबॉलचा दिग्गज खेळाडू ज्लाटेन इब्राहिमोविक (Zlatan Ibrahimovic Retirement) याने फुटबॉल (Football) खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे.  इब्राहिमोविकच्या खेळाचे लाखो चाहते असून यापैकीच एक टीम इंडियाच यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहदेखील आहे.  स्वीडनचा स्टार फुटबॉलपटू ज्लाटेन इब्राहिमोविक याने रविवारी व्यावासियक फुटबॉलमधून निवृत्त होत असल्याचं सांगितलं.  इब्राहिमोविकने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बुमराहने दु:ख व्यक्त करत आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक भाविनिक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये बुमरहाने  इब्राहिमोविक कायम आपल्यासाठी प्रेरणादायी राहिल्याचं म्हटलंय.


बुमराहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, 'इब्राहिमोविक माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे, कधी ही हार न  मानण्याची त्याच्या वृत्तीने मला बळ मिळालं, खेळाच्या माध्यमातून आम्हाला अनेक अविस्मरणीय आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद' असं बुमराहने म्हटलंय. 



कोण आहे इब्राहिमोविक
ज्लाटेन इब्राहिमोविक हा स्वीडनचा स्टार फुटबॉलपटू आहे. 2001 मध्ये त्याने स्वीडिश क्लब 'माल्मो' कडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर त्याने अल्पावधीतच छाप उमटवली. युरोपमधले दिग्गज फुटबॉल क्लब बार्सिलोना, ज्युवेंट्स, इंटर मिलान, एसी मिलान आणि मँचेस्टरसाठी तो खेळला आहे. याशिवाय LA Galaxy साठी देखील तो काही हंगाम खेळला. 58 सामन्यात त्याच्या नावावर 53 गोलची नोंद आहे. 


जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त
जसप्रीत बुमराह इब्राहिमोविकचा मोठा चाहता आहे. बुमराह गेला काही काळ टीम इंडियापासून दूर आहे. 2022 सप्टेंबर महिन्यात बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडला. त्यानंतर एशिया कप किंवा आयपीएलमध्येही तो खेळू शकला नाही. बुमराहने भारतासाठी 30 कसोटी सामन्यात 128 विकेट घेतल्या आहेत. 27 धावात 6 विकेट ही त्याची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 72 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 121  विकेट आहेत. टी20 क्रिकेटमध्ये बुमराहने 60 सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत.