India vs Sri Lanka ODI Series : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेला एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश  (India to Seal 3-0 Whitewash) दिला. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने 3-0 अशी जिंकली. इतकंच काय तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताने सर्वाधिक धावांनी विजय मिळवला. याआधी न्यूझीलंडचा 290 धावांचा विक्रम होता. भारताने 317 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडचा विक्रम मोडला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 390 धावांचं बलाढ्य आव्हान ठेवलं होतं. पण श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 73 धावात आटोपला. ( India break record for largest win margin by runs beat Sri Lanka by 317)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय गोलंदाजांनी केली कमाल
श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत फलंदाजांबरोबर युवा गोलंदांनीही (Bowlers) कमाल केली. शेवटच्या एकदिवसीय सामन्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 5 विकेट घेतल्या तर या संपूर्ण मालिकेत 9 विकेट घेत तो या मालिकेतील सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज ठरला. तर चायनामन कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वेगाचा बादशहा उमरान मलिकने (Umran Malik) या मालिकेत प्रत्येकी 5 विकेट घेतल्या. 


मोहम्मद शमीची कारकिर्द संपली?
भारतीय युवा गोलंदाज कमाल करत असताना भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) मात्र या मालिकेत काही खास कामगिरी करु शकला नाही. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शमीला केवळ 3 विकेट घेत्या आल्या. पण यासाठी त्याला 130 धावा मोजाव्या लागल्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 1  आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे शमीच्या क्रिकेट कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. 


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खातं रिकामं
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर उमरान मलिकने 2 आणि अक्षर पटेलने (Axer Patel) 1 विकेट घेतली. पण या सामन्यात मोहम्मद शमीला एकही विकेट घेता आली नाही. शमीच्या या कामगिरीमुळे टीम इंडियातल्या त्याच्या जागेला धोका निर्माण झाला आहे. 


युवा खेळाडूंचं आव्हान
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील त्या कामगिरी बघता युवा खेळाडूंचं त्याच्यासमोरचं आव्हान वाढत आहे. सध्या भारतीय संघात अर्शदीप सिंह (Arshdeep Singh), उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज सारखे युवा गोलंदाज आहेत, जे कामगिरीने सातत्याने छाप उमटवतायत. शिवाय टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) देखील लवकरच संघात पुनरागमन करेल. अशात शमीला आपली जागा टिकवून ठेवण कठिण बनणार आहे. 


मोहम्मद शमीची क्रिकेट कारकिर्द (Mohammed Shami Internation Cricket Career)
मोहम्मद शमीने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारतासाठी त्याने 60 कसोटी, 84 एकदिवीय आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात 216, एकदिवसीय सामन्यात 153 आणि टी20 सामन्यात 24 विकेट त्याच्या खात्यात जमा आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 300 हून अधिक विकेट त्याने घेतल्या आहेत. 2015 आणि 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शमीने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.