Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये एका व्हिडिओने सध्या खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) माजी कर्णधार सलमान बट्टने (Salman Butt) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. टी20 वर्ल्ड कप दरम्यानचा हा व्हिडिओ असून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) याप्रकरणी कारवाई करण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहिन शाहा आफ्रिदीच्या (Shaheen Afridi) अडचणीत वाढ होणार आहे. टी20 वर्ल्ड कप दरम्यान शाहिन आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि इतर खेळाडूंबरोबर वाईट वर्तुणूक केली असा त्याच्यावर आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट संघाचे कोच गॅरी कर्स्टन यांच्या सूचनांकडे शाहिन आफ्रिदने दुर्लक्ष केलं. याची तक्रार गॅरी कर्स्टन यांनी टीम मॅनेजर वहाव रियाझ यांच्याकडेही केली होती. सुरुवातील या तक्रारींकडे संघ व्यवस्थापनास कोणीच विश्वास ठेवला नाही. पण आता सलमान बट्टने व्हिडिओ शेअर केल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 


शाहिनचा बाबर आझमला धक्का
सलमान बट्टने सोशल मीडिआवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात शाहिन आफ्रिदी चक्क बाबर आझमला धक्का मारताना दिसत आहे.  व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विकेट घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदी जल्लोष करताना दिसत आहे. संघातील खेळाडूला त्याचं कौतुक करतायच, त्याचवेळी कर्णधार बाबर आझमही त्याला हात मिळवण्यासाठी पुढे येतो. पण शाहिन आफ्रिदी बाबरकडे पाहात नाही, इतकंच नाही तर हात मिळवण्याऐवजी त्याला हाताच्या कोपऱ्याने धक्का मारून बाजूला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सलमान बट्टने शेअर केला असून त्यासोबत सलमान बट्टने एक वाक्यही लिहिलंय. यात त्याने म्हटलंय, हा तोच व्हिडिओ आहे, ज्याबाबत गॅरी कर्स्टनने आपल्या व्हिडिओमध्ये नमुद केलं आहे. शाहिन आफ्रिदीचा बाबर आझमबद्दलची अपमानित करणारी भूमिका'



शाहिन आफ्रिदीवर कारवाई होणार?
सलमान बट्टने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये दुफळी माजल्याच्या चर्चांना पाठिंबा मिळालाय. पाकिस्तान क्रिकेटमध्ये बाबर आझम आणि शाहिन आफ्रिदी असे दोन गट असल्याचं यामुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे. आता हा व्हिडिओच व्हायरल झाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड शाहिन आफ्रिदीवर कारवाई करण्याची शक्यता आहे. गॅरी कर्स्टन यांनी शाहिन आफ्रिदीची तक्रार केल्यानंतरही संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर कारवाई केली नव्हती. 


पण टी20 वर्ल्ड कपमधल्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीनंतर पीसीबीने गांभीर्याने घेतलं आहे. वहाब रियाझलची पीसीबीमधऊन हकालपट्टी करण्यात आली आहे. आता शाहिन आफ्रिदीवर काय कारवाई होणार याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.