India vs Pakistan Asia Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याची उत्सुकता जगभरातील क्रिकेट प्रेमींना असते.  आयसीसीच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतात. यात भारतीय क्रिकेट संघाचा पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा हे दोन कट्टर संघ आमने सामने उभे ठाकले आहेत. महिला एशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक (Women Asia Cup 2024 Schedule) जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना होणार आहे. 19 जुलैला हा सामना खेळवण्यात येणार असून स्पर्धेतील हा सर्वोत महत्त्वाचा सामना असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एशिया स्पर्धेतील यशस्वी संघ
एशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिला क्रिकेट संघ सर्वात यशस्वी ठरला आहे. एकदिवसीय आणि टी20 फॉर्मेटमध्ये महिला टीम इंडियाने तब्बल सातवेळा एशिया कपचं जेतेपद पटकावलं आहे. टीम इंडिया एशिया कपचा गतविजेता संघ आहे. 2022 मध्ये टीम इंडियाने एशिया कपवर नाव कोरलं होतं. याआधी टी20 फॉर्मेटमध्ये खेळल्या गेलेल्या एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने  2012, 2016 आणि 2022 मध्ये विजय मिळवला होता. यंदाही टी20 फॉर्मेटमध्ये एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. 


एशिया कप स्पर्धेत आठ संघांचा समावेश
महिला एशिया कप 2024 स्पर्धेत आठ संघाचा समावेश आहे. यात दोन ग्रुप असून प्रत्येकी चार संघांचा एक ग्रुप आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये टॉपचे दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. 28 जुलैला एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 19 जुलैला रंगणार आहे. ए ग्रुपमध्ये भारतीय संघाशिवाय ग्रुपमध्ये नेपाळ, पाकिस्तान आणि यूएई संघांचा समावेश आहे. महिला एशिया कप 2024 चं आयोजन श्रीलंकेत होत असून स्पर्धेतील सर्व सामने रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये खेळवले जाणार आहेत. 


भारतीय संघाचं ग्रुपमधल्या सामन्यांचं वेळापत्रक


19 जुलै (शुक्रवार): भारत विरुद्ध पाकिस्तान -संध्याकाळी 7:00 वाजता, रंगिरी दांबुला इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, श्रीलंका


21 जुलै (रविवार): भारत विरुद्ध यूएई - दुपारी 2:00 वाजता, रंगिरी दांबुला इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, श्रीलंका
23 जुलै (मंगळवार): भारत बनाम नेपाल - संध्याकाळी 7:00 वाजता, रंगिरी दांबुला इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, श्रीलंका


कुठे पाहू शकता सामने
महिला एशिया कप 2024 स्पर्धेचे सर्वे सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येणार आहेत. तर लाईव्ह स्ट्रिमिंग डिज्नी+हॉटस्टारवर होणार आहे. 


महिला एशिया कप 2024साठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेट कीपर), उमा छेत्री (विकेट कीपर ), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्रकार, अरुंधति रेड्डी, जेमिमा रोड्रिग्स, रेणुका ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटिल, सजाना सजीवन