WPL मध्ये धक्कादायक प्रकार, स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकावण्यापासून रोखलं... Video व्हायरल
Volunteers Force To Stop Waving MI Flags: वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सदरम्यान सामना रंगला. मुंबई इंडियन्सने रंगतदार लढतीत गुजरात जायंट्सवर मात केली. पण या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Volunteers Force To Stop Waving MI Flags: वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेट चाहत्यांना रंगतदार लढतींची मेजवानी मिळतेय. रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians-W) आणि गुजरात जायंट्सदरम्यान (Gujarat Giants-W) आणखी एक चुरशीची लढत पाहिला मिळाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर 5 विकेट राखून विजय मिळवला. WPL च्या दुसऱ्या हंगामातील हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय ठरला आहे. पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सने ट्ऱॉफीवर नाव कोरलं होतं.
सामन्यादरम्यान धक्कादायक प्रकार
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्या बंगळुरुच्या केएम चिन्नास्वामी स्टेडिअमवर (KSCA M Chinnswamy Stadium) सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्यांना मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकवण्यापासून रोखण्यात (MI Flag Removed in M Chinnaswamy Stadium) आलं. स्टेडिअममधल्या वॉलिंटयर्सने आपल्याला रोखलं आणि धमकी दिली असा आरोप मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वॉलिंटयर्सने या चाहत्याला हे गुजरात जायंटसचं होम ग्राऊंड आहे, त्यामुळे इथे मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकावू शकत नाही, असं धमकावलं, इतकंच नाहीत तर या वॉलेंटियर्सने चाहत्यांच्या हातातले मुंबई इंडियन्सचे झेंडेही काढून घेतले,
चाहत्यांनी व्यक्त केला संताप
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केलं आहे. पियूश नाथानी नावाच्या एका युजरने आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने म्हटलंय. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सदरम्यान वुमन्स प्रीमिअर लीगचा सामना खेळवला जात असून स्टेडिअममधले वॉलेंटिअर्स मुंबई इंडियन्सचे झेंडे काढून घेत आहेत, तसंच आम्हाला धमक्या देत आहेत. पियुशने शेअर केलेल्या व्हिडिओत वॉलेंटियर्स चाहत्यांच्या हातातले झेंडे हिसकावून घेत असल्याचं दिसंतय.
WPL मध्ये रंगतदार लढती
दरम्यान वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये रंगतदार लढती पाहिला मिळतायत. डब्ल्युपीएलमधील तिसरा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायटंसमध्ये रंगला. पहिली फलंदाजी करताना गुजराज जायंट्सचा संघ अवघ्या 126 धावांमध्ये गडगडला. अमेलिया किरने 4 विकेट घेतला. विजयांच हे आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने 5 विकेट गमवात विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत कौरने 46 धावांची शानदार इनिंग खेळतर मुंबईला विजय मिळवून दिला. याआधी पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा चार विकेटने पराभव केला होता.
बंगळुरु आणि दिल्लीत सामने
महिला प्रीमिअर लीगचे सर्व सामने दिल्लीच्या अरुण जेटली मैदान आणि बंगळुरुच्या एम चिन्नास्वाम मैदानात खेळवले जात आहेत. 23 फेब्रुवारीपासून WPL ला सुरुवात झाली असून 17 मार्चला फायनल रंगणरा आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या पाच संघांमध्ये स्पर्धा रंगतेय.