Ajay Jadeja : गुजरातच्या जामनगरचे जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांनी शुक्रवारी आपल्या वारसाची घोषणा केली आहे. त्यांनी भारताचा माजी क्रिकेटर अजय जडेजाला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. माजी क्रिकेटर अजय जडेजा हा मूळचा जामनगरचाच असून तो जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांच्या खूप जवळचा आहे. त्यामुळे अजय जडेजा हा जामनगरचा नवा जाम साहेब बनणार अशी चर्चा आधीपासूनच होती. 


कसा आहे राजघराण्याचा इतिहास? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याचे जाम साहेब शत्रुशल्य सिंह हे निपुत्रिक आहेत, त्यामुळे त्यांना आपला वारस निवडावा लागणार होता. तेव्हा दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी वारस म्हणून अजय जडेजाची निवड केली. जाम साहेब शत्रुशल्य सिंहजी यांचे वडील दिग्विजय सिंह हे 33 व्या वर्षी जाम साहेब झाले. त्यांचे काका रणजितसिंहजी यांनी त्यांना दत्तक घेऊन त्यांचा वारस बनवला होता. भारतीय क्रिकेटची देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफी जाम साहेब रणजित सिंग यांच्या नावाने खेळली जाते.


अजय जडेजा हा नजित सिंह आणि दिलीप सिंह यांच्या कुटुंबातून असून त्याचा शुक्रवारी अधिकृतपणे त्याची वारस म्हणून घोषणा करण्यात आली. दिग्गज क्रिकेटर केएस रणजित सिंह हे 1907 ते 1933 पर्यंत नवानगरचे राज्यकर्ते होते. रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी रणजीत सिंग आणि केएस दिलीप सिंग यांच्या नावाने आयोजित केली जाते.  शत्रुशल्य सिंह हे सुद्धा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते आणि नवानगरचे महाराजा ही पदवी मिळवणारे ते शेवटचे व्यक्ती होते.


हेही वाचा : IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत


 


अजय जडेजाची टीम इंडियातील कारकीर्द : 


अजय जडेजा हा भारतीय क्रिकेट टीममधील दिग्गज खेळाडू असून 1992 ते  2000 पर्यंत तो टीम इंडियाचा भाग होता. तसेच अजय जडेजाने टीम इंडियाच्या उपकर्णधार  जबाबदारी सुद्धा सांभाळली. भारतासाठी त्याने 15 टेस्ट आणि 196 वनडे सामने देखील खेळले. आता 53 वर्षांचा अजय जडेजा हा जामनगर परिवाराचा वारसदार बनणार आहे. मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यावर त्याच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. 2003 अधे दिल्ली हायकोर्टाने जडेजावरील बॅन हटवला. त्यानंतर अजय आयपीएलमध्ये विविध संघांचा मेंटॉर सुद्धा होता. तसेच अजय जडेजाने अफगाणिस्तानच्या टीमला कोच म्हणून सुद्धा काम पाहिले.