It`s a Boy! भारतीय क्रिकेटपटूच्या घरी नवा पाहुणा; फोटोसह सांगितलं बाळाचं नाव
बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम
मुंबई : काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यानं त्याच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलं होतं. ही गोड बातमी चर्चेत असतानाच आता भारतातील आणखी एका क्रिकेटपटूनं त्याच्या घरी आलेल्या एका नव्या पाहुण्याची झलकच सर्वांना दाखवली आहे.
हा क्रिकेटपटू आहे इरफान पठाण. इरफाननं सोशल मीडियाच्या मदतीनं सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित आणणारी ही बातमी दिली आहे.
इरफान आणि त्याची पत्नी, सबा बेग यांच्या नात्यात एक पाहुणा आला आहे. अर्थात सबानं दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.
इन्स्टाग्रामवरुन मुलासोबतचा एक फोटो पोस्ट करत इरफाननं ही Good News शेअर केली.
सुलेमान खान, असं या मुलाचं नाव असल्याचंही इरफाननं सांगितलं. डिसेंबर 2016 मध्ये इरफान आणि सबानं त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माची बातमी दिली होती.
4 फेब्रुवारी 2016 मध्ये इरफाननं मॉडेल सबा बेग हिच्याशी निकाह केला होता. सौदी अरेबियातील मक्का येथे हा निकाह पार पडला होता.
2020 मध्ये त्यानं क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेत क्रीडाजगताचं लक्ष वेधलं होतं.
सध्या इरफान ऑनफिल्ड सक्रिय नसला तरीही ऑफफिल्ड, एक बाबा म्हणून तो पुन्हा एकदा नव्यानं जन्मला आहे असं म्हणायला हरकत नाही.